

भारताला टी २० मालिकेआधी मोठा धक्का
ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डीला दुखापत
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी २० सामने खेळणार नाही
Nitish Kumar Reddy Ruled out : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यर दुखापतीमुळं संघातून बाहेर झाला असून, आता टी २० मालिकेआधी टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी २० मालिकेआधीच ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी संघातून बाहेर झाला आहे. तो तीन सामने खेळू शकणार नाही.
नितीश कुमार रेड्डी ऑलराउंडर असून, त्याचा फिटनेस हा चिंतेचा विषय ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू झाली असून, पहिल्या सामन्याआधीच टीम इंडियासाठी वाईट बातमी आली आहे. नितीन कुमार रेड्डी हा तीन सामने खेळू शकणार नाही. वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. तो अद्याप तंदुरुस्त झालेला नाही. दिलासादायक बाब म्हणजे रेड्डीला पर्यायी खेळाडू आहे. शिवम दुबे हा ऑलराउंडर म्हणून खेळणार आहे.
नितीशकुमार रेड्डीच्या पायाला दुखापत झाली आहे. वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तो जायबंदी झाला होता. त्यानंतर त्याच्या मानही आखडली होती. त्यामुळे तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकला नाही. बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्यावर उपचार करत आहे. रेड्डी फिट झाला असता तर त्याला संघात स्थान मिळालं असतं. कदाचित तो ऑस्ट्रेलियात मॅचविनर खेळाडू म्हणून फिट होता, असं मानलं जात आहे. रेड्डीनं आतापर्यंत ४५ च्या सरासरीने ९० धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १८० च्या आसपास आहे. टी २० मध्ये त्यानं तीन विकेटही घेतल्या आहेत.
कॅनबेरामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी २० सामना सुरू आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक गमावली आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अर्शदीप सिंगला प्लेइंग ११ च्या बाहेर ठेवलं आहे. टी २० मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या अर्शदीपच्या जागी हर्षित राणाला संधी दिली आहे. कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती या तिघांना संघात स्थान दिलं आहे. तर सहावा गोलंदाज म्हणून शिवम दुबे संघात आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन
सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.