

उत्तर प्रदेशातील आजमगढ जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. एका टायर दुरुस्तीच्या दुकानात टायरमध्ये हवा भरताना अचानक टायर फुटल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचं सर्वात वेदनादायक दृश्य म्हणजे अपघाताच्या वेळी त्याची लहान मुलं घटनास्थळी उपस्थित होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना एका स्थानिक टायर दुरुस्ती दुकानात घडलीये. संबंधित व्यक्ती नेहमीप्रमाणे टायरमध्ये हवा भरत होता. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, सुरुवातीला सर्वकाही नेहमीप्रमाणे सुरु होतं. मात्र काही क्षणातच अचानक जोरदार आवाज झाला आणि टायर फुटला. टायर फुटण्याचा स्फोट इतका तीव्र होता की, संबंधित व्यक्ती हवेत उडून रस्त्यावर जाऊन पडली.
या अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. त्या ठिकाणी जवळ उपस्थित असलेल्या लोकांनी तत्काळ त्याच्याजवळ धाव घेतली. त्या जखमी व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी त्याची अवस्था अत्यंत गंभीर होती आणि काही क्षणांतच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरला आहे. अनेकांनी या घटनेवर शोक व्यक्त केलाय. काही युजर्सनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, “अशा प्रकारच्या कामांमध्ये सुरक्षित साधनांचा वापर गरजेचं आहे. तर काहींनी हा व्हिडीओ फार हृदयद्रावक असल्याचं म्हटलंय.
या व्हिडीओमधील मन हेलावून टाकणारं दृश्य म्हणजे त्या मृत व्यक्तीची लहान मुलं. स्फोटानंतर त्याचा मुलगा आणि मुलगी धावत त्याच्याकडे “पापा-पापा” अशी हाक मारत गेले आणि रडू लागले.
(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.