Viral incident: बॉयफ्रेंडनं एक्सचा फोटो लाईक केला, गर्लफ्रफ्रेंडनं त्याची थार फक्त ५ हजारात विकली

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेत एका गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडची थार गाडी विकल्याचा दावा केला जातोय. नेमकं प्रकरण काय आहे आणि यामागचं सत्य जाणून घ्या.
Viral incident
Viral incidentsaam tv
Published On

दिल्लीमध्ये एक अशी घटना घडली आहे जी सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होतेय. यामध्ये एका तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडची थार गाडी विकल्याचा दावा केला जातोय. बॉयफ्रेंडच्या एका चुकीने गर्लफ्रेंडने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय. नेमकी ही घटना काय आहे ते जाणून घेऊया.

सोशल मीडियावर व्हायरल झाली घटना

व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, तिच्या बॉयफ्रेंडने त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडच्या लग्नातील फोटोला सोशल मीडियावर लाईक केलं होतं. या घटनेमुळे यामुळे दोघांमध्ये मोठा वाद झाला. हा वाद झाल्यानंतर काही वेळाने त्या तरुणीने त्याची महिंद्रा थार SUV एका स्थानिक खरेदीदाराला विकल्याचा दावा केला जातोय. सोशल मीडियावर पसरत असलेल्या माहितीनुसार, तिने ही गाडी फक्त ५ हजारांना विकली आहे.

Viral incident
Clever Crow Viral Video : लहानपणीच्या गोष्टीतील चतुर कावळा सापडला..VIDEO पाहून नेटकरी चक्रावले

या घटनेबाबत अजून कोणतीही अधिकृत पोलीस तक्रार नोंदवली गेली आहे का याची स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. दरम्यान हे प्रकरणं खरं आहे की खोटं याची सत्यता पडताळून पाहिली जातेय.

लोकांच्या विविध प्रतिक्रिया

ही बातमी सोशल मीडियावर वेगाने पसरत असून यावर लोकांच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर समोर येतायत. काही यूजर्सनी या कृतीवर तीव्र टीका करत हे बेकायदेशीर आणि विश्वासघाताचं उदाहरण असल्याचं म्हटलंय. तर काहींनी मुलीचं वागणं अत्यंत चुकीचं असल्याचंही म्हटलं आहे.

आजकाल 'लाईक' किंवा 'कॉमेंट'सारख्या गोष्टीही नात्यांमध्ये शंका निर्माण करू शकतात, असं एका यूजरने लिहिलंय. तर दुसऱ्या एका युजरने असं म्हटलंय की, एका छोट्या चुकीसाठी असं करणं योग्य नाही.

Viral incident
Angry Bull Attack: १,२ नव्हे ३ वेळा, रस्त्यावरच ट्रॅक्टरला जोरात बैलाने धडक दिली, ट्रक्टरचा चेंदामेंदा झाला, थरारक व्हिडिओ

या व्हायरल घटनेने एक मोठा प्रश्न पुन्हा समोर येतो की, आजची नाती सोशल मीडियावरील कृतींवर किती अवलंबून आहेत? तसंच स्क्रीनवर घडणाऱ्या गोष्टी प्रत्यक्ष आयुष्यातील नात्यांवर किती प्रभाव टाकतात हे देखील यामधून दिसून येतं.

Viral incident
Viral trending news: एक खिडकी उघडी ठेऊन केली मोठी चूक; तीन वर्षांनी घरी परतला आणि पाहिलं तर...

(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com