Arjun Kapoor : "शेवट स्वीकारा..."; अर्जुन कपूरला नेमकं झालं काय? क्रिप्टिक पोस्ट चर्चेत

Arjun Kapoor Cryptic Post : अर्जुन कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.
Arjun Kapoor Cryptic Post
Arjun KapoorSAAM TV
Published On
Summary

अर्जुन कपूर सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

अर्जुन कपूरने सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.

अर्जुन कपूरचे चाहते पोस्ट पाहून चिंतेत आहेत.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर गेल्याकाही दिवसांपासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. तो सोशल मीडियावर सक्रिय असतो. आपल्या लाइफचे, कामाचे अपडेट तो चाहत्यांना देत राहतो. नुकतीच अर्जुन कपूरने इंस्टाग्राम एक स्टोरी शेअर केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच अनेक चर्चांना उधाण आले आहे. ज्यामुळे चाहते चिंतेत आहेत.

अर्जुन कपूरने गुरुवारी इंस्टाग्राम स्टोरीवर काही लाइन्स लिहून शेअर केल्या आहेत. ज्यामुळे चाहत्यांना ही स्टोरी नक्की कशाबद्दल, कोणासाठी आहे याचा प्रश्न पडला आहे. त्याने लिहिले की, "शेवट स्वीकारा, जरी तो तुम्हाला हवा तसा नसला तरी..." अर्जुन कपूरची ही स्टोरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अर्जुन कपूरच्या या स्टोरीवर नेटकरी कमेंट्स करत आहेत. तसेच अभिनेत्यासाठी चिंता व्यक्त करत आहेत. "अर्जुन नैराश्यातून जात आहे...", "अर्जुनला नेमकं झालं काय?", "अर्जुन ट्रोलिंगला कंटाळला...", अर्जुनचे वैयक्तिक आयुष्य बिघडले वाटते..." अशा अनेक कमेंट्स येत आहेत. काही दिवसांपूर्वी अर्जुनने आपल्या आईच्या वाढदिवसाला एक भावुक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्याने लिहिलं होत की, "आयुष्य माझ्याशी फारसं चांगलं वागलं नाही, पण हरकत नाही... मी याआधीही अनेक आघात सहन केले आहेत आणि पुढेही करेन, कारण तूच मला लढायला आणि सर्व आव्हानांना सामोरे जायला शिकवलं आहेस. लवकरच भेटू आणि आपण तुझा वाढदिवस एकत्र साजरा करू..."

Arjun Kapoor
Arjun Kapoor instagram

अर्जुन कपूर वर्कफ्रंट

अर्जुन कपूर शेवटचा 'मेरे हजबंड की बीवी' या चित्रपटात दिसला. ज्यात तो भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंगसोबत झळकला. २०२४ मध्ये, अर्जुन 'सिंघम अगेन'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. अर्जुनच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. चाहते आता अर्जुनच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अर्जुन आता 'नो एंट्री २' या चित्रपटात दिसणार आहे. यात अर्जुन कपूर आणि वरुण धवन यांची जोडी पाहायला मिळेल.

Arjun Kapoor Cryptic Post
Famous Actor : 'तुला निळ्या ड्रममध्ये टाकेन', प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com