

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोघांनी आयुष्य संपवलं
एसटी कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून केली आत्महत्या
एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने परिसरात खळबळ
छत्रपती संभाजीनगरमध्ये विवाहित महिलेने आयुष्य संपवल्याची घटना ताजी असताना सिल्लोडमधूनही धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आगारातील सहायक वाहतूक निरीक्षकाने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
शरद विठ्ठल भिवसने असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. शरद भिवसने यांच्या आत्महत्येनंतर सिल्लोड शहर पोलिसांनी डेपो मॅनेजरसह तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय. शरद भिवसने यांनी आयुष्य संपवल्याने एसटी कर्मचारी आणि नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
आत्महत्या केलेल्या भिवसने यांच्या नातेवाईंकांनी दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. नातेवाईकांच्या आक्रमक भूमिकेमुळे शहर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती. सहकाऱ्याच्या निधनाने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुपारी ४ वाजता सिल्लोड आगारातील बससेवा बंद पाडली होती.
कर्मचाऱ्यांनी बंद पुकारल्याने ग्रामीण भागात जाणाऱ्या २० बस फेऱ्या ठप्प झाल्या होत्या. भिवसने यांच्या नातेवाईकांनी रात्री उशिरा दिलेल्या तक्रारीनुसार, डेपो मॅनेजर विजय काळवणे, वाहतूक निरीक्षक किरण अवसरमल, लिपीक विकास चव्हाण हे भिवसने यांना सतत मानसिक त्रास देत होते. त्यांना शिवीगाळ करून वारंवार बाहेर ड्युटी लावण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. अधिकाऱ्यांच्या याच छळाला कंटाळून आयुष्य संपवल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. या तक्रारीनुसार, पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या का केली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.