Maharashtra Live News Update : ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीसाठी पुण्यातील दोन मुक्कामाचा पालखी मार्ग बदलणार?

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, रूपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या , गॅस सिलिंडरचा तुटवड्याचे संकट, इराण-इस्त्राइल-अमेरिका युद्धाचे अपडेट, राज्यातील राजकीय घडामोडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam

सोलापूर महापालिका अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर आज होणार शिक्कामोर्तब,चार वर्षानंतर प्रथमच सभागृहात अंदाजपत्रक सादर होणार

सोलापूर महापालिकेचा आर्थिक अंदाजपत्र आज सादर केले जाणार आहे.सोलापूर महानगरपालिकेचा प्रशासकीय अंदाजपत्रक साधारण 1400 कोटी रुपयांचा चर्चेला जाणार आहे.स्थायी समितीच्या सभापती रंजीता चाकोते यांच्याकडून प्रशासकीय अंदाजपत्रक सादर केले जाईल. सोलापूर महापालिका आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी 1383 कोटी रुपयांचे प्रशासकीय अंदाजपत्रक सादर केले होते.त्यात 5 कोटी 68 लाख रुपयांची वाढ करत 1387 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायीमध्ये बहुमताने मंजूर करुन सभागृहाकडे पाठवले आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या आठ झोन अंतर्गत होणारी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी 147 कोटी रुपयांची तरतूद केली होती.ती 110 कोटी रुपये करण्यात आली.गेली चार वर्ष प्रशासनाने अंदाजपत्रक सादर केले आहे.चार वर्षानंतर प्रथमच सभागृहात अंदाजपत्रक सादर होत आहे.नव्या नगरसेवकांपुढे तो अभ्यासाचा विषयही होईल.त्यादृष्टीने त्याकडे पाहिले जात आहे.

nashik-manmad-मनमाड बाजार समिती बंद,मार्च अखेर व बँक सुट्ट्यांमुळे बाजार समिती बंद राहणार

मनमाड बाजार समिती आज पासून पुढील पाच ते सहा दिवस बंद राहणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने जाहीर केले आहे.मार्च अखेर असल्याने तसेच बँकांना असलेल्या सुट्ट्यांमुळे व्यापारी वर्गाच्या विनंती अर्जा नुसार बाजार समिती मधिल कांद,भूसार मालाचे सर्व लिलाव बंद राहणार असल्याने शेतक-यांचे मात्र हाल होणार आहे,आधिच हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केलेला असल्याने शेतक-यांचे बंदमुळे अधिकच हाल होणार

ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीसाठी पुण्यातील दोन मुक्कामाचा पालखी मार्ग बदलणार? वाढत्या गर्दीमुळे मोठ्या मैदानाची मागणी जोरात

पुण्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या दोन दिवसांचा मुक्कामी पालखी मार्ग बदलण्याची मागणी तीव्र झालीय १३ एप्रिलच्या बैठकीत पुणे जिल्हाधिकारी आणि आळंदी देवस्थान विश्वस्त यांच्यात यावर निर्णायक चर्चा होणार आहे…

जालन्यातील राजुर गणपती येथील आठवडी बाजारात पुरवठा विभागाची अचानक छापेमारी

जालन्यातील भोकरदन तालुक्यातल्या राजुर गणपती येथील रविवारच्या आठवडी बाजारात आज पुरवठा विभागाने अचानक छापेमारी केली.या छापेमारी मध्ये आठवडी बाजारातल्या छोट्या-मोठ्या हॉटेलमध्ये वापरत असलेले दहा घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले, व्यावसायिक गॅसचा पुरवठा मागच्या काही दिवसापासून बंद असल्याने अनेक ठिकाणी हॉटेल व्यवसायिक घरगुती गॅस सिलेंडरचा छुप्या मार्गाने बेकायदेशीररित्या वापर करत असल्याने पुरवठा विभागाकडून हॉटेल व्यवसायिकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जात आहे, दरम्यान जालना जिल्ह्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्यापासून पुरवठा विभाग ॲक्शन मोडवर आला असून धडक कारवायांचे सत्र सुरू आहे.

बिल भरा, अन्यथा अंधारात राहा” असा इशारा देत महावितरणकडून थकबाकीदारां विरोधात आक्रमक मोहीम

- १ मार्चपासून ३६ हजार वीज कनेक्शन खंडित, मोठ्या प्रमाणावर थकबाकीदारांवर कारवाई

- नागपूर जिल्ह्यात ४३ कोटींची थकबाकी असल्यानं महावितरणची कठोर भूमिका

देशात घरविक्री १ लाखाच्या पार

जानेवारी-मार्च २०२६ तिमाहीत देशातील सात महानगरांत १,०१,६७५ घरांची विक्री झाली. यापैकी मुंबई-पुण्यात ४८ हजारांहून अधिक घरे विकली गेली. मागील तिमाहीच्या तुलनेत विक्रीत ७% घट, तर गतवर्षीच्या तुलनेत ९% वाढ नोंदली.

कर्जाच्या विळख्यात तरुण शेतकऱ्याची जीवनयात्रा संपली

निसर्गाची अवकृपा आणि व्यवसायातील सततच्या घाट्ट्यामुळे हवालदिल झालेल्या एका तरुण शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना पवनी तालुक्यातील सावरला येथे घडली आहे. प्रकाश धोंडुजी सावरबांधे (वय ४० वर्षे) असे या मृत शेतकऱ्याचे नाव असून, कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी शेतात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

शिरूरच्या वरुडे-धामारी रोडवर भीषण अपघात भरधाव गाडी खांबावर आदळून खड्ड्यात,थरार CCTV मध्ये कैद

वरुडे धामारी रोडवरील अरुंद रस्ता, तसेच वेग नियंत्रणासाठी कोणतेही स्पीड ब्रेकर नसल्यामुळे भीषण अपघात घडला आहे भरधाव वेगात असलेल्या चारचाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट लोकवस्तीच्या परिसरात घुसली रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आदळून गाडी खड्ड्यात जाऊन कोसळली हा संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही… मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे… या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, तातडीने स्पीड ब्रेकर बसविण्याची आणि रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी जोर धरू लागली आह

Maharashtra Live News Update : नागपुरात बालाघाट मेमू गाडी रुळावरून घसरली, मोठा अपघात टळला

- नागपुरात बालाघाट इतवारी मेमू गाडी रुळावरून घसरली, मात्र वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला

- दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतील घटना कामठी-कळमना दरम्यान अपघात

- ६८७१५ बालाघाट-इतवारी मेमू गाडीची घटना, रात्री ९:४५ वाजताच्या सुमारास घटना

- इंजिनला जोडलेल्या पहिल्या दोन डब्यांची चाके घसरली, संथ वेगामुळे मोठा अपघात टळला

- एकही प्रवासी जखमी नाही सुदैवाने जीवितहानी टळली,

खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या ताफ्याला ट्रकची धडक

भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या कारला आज सकाळी नागपूरजवळ एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली.

पुसद मध्यवर्ती बॅकमधून बंद खात्यातून विड्राॅल, मॅनेजर निलंबित, दोन कर्मचारी बडतर्फे

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांत अनियमितता, गैरव्यवहाराची प्रकरणे घडलीये अनेक प्रकरणे अजूनही चौकशीत असून याचवेळी पुसद येथील मुख्य शाखेतील प्रकरण समोर आले आहेत बंद खात्यातून चक्क दीड लाख रुपये काढल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँक प्रशासनाने मॅनेजरचे निलंबन तर दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिसली केल्याची कारवाई केली आहे.

सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणात सर्वात मोठी अपडेट...

जिल्हा परिषद राडा प्रकरण सातारा पोलीस अधीक्षक यांना भोवले...

सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश...

चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी...

श्री येडेश्वरी देवीच्या चैञ पोर्णिमा याञेची तयारी पुर्ण, मंदीर ट्रस्ट व प्रशासनाकडुन चोख नियोजन

तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून ओळख असलेल्या येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैञ पोर्णिमा याञा उत्सवाला 2 एप्रिल रोजी प्रारंभ होणार आहे.या याञेतील मुख्य चुना वेचण्याचा कार्यक्रम 3 एप्रिल रोजी पार पडणार असुन यासाठी राज्यभरातुन 15 लाखांहून अधिक भाविक येत असतात. मराठवाड्यातील सर्वात मोठी आणि प्रमुख याञा म्हणुन येडेश्वरी देवीच्या चैञ पोर्णिमा याञेकडे पाहीले जाते दरम्यान याञेच्या अनुषंगाने येडेश्वरी मंदीराच्या मुख्य शिखराला रंगरंगोटी करण्यात आली असुन स्वच्छतेसह येणाऱ्या भाविकांना पाण्याची, सावलीची सोय करण्यात आली आहे

वाशिम शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन कंत्राटदाराने तोडली

वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईन रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने तोडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा संतापजनक प्रकार तीन दिवसापासून सुरू आहे..

वाशिम शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम सध्या चालू असून,काम सुरू असताना पुला खालील पाईपलाइनचा मुख्य पाईप तोडून टाकल्याने वाशिम शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com