Dhurandhar 2: 'धुरंधर: द रिव्हेंज'चा क्लायमॅक्स बदलला! 'जसकिरत'ला मिळाला नवा शेवट

Dhurandhar 2: 'धुरंधर: द रिव्हेंज' मधील क्लायमॅक्स सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये AI वापर करुन नवा क्लायमॅक्स तयार करण्यात आला आहे.
Dhurandhar 2
Dhurandhar 2Saam tv
Published On

Dhurandhar 2: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाची प्रदर्शनाआधीपासूनच चर्चा होत आहे. याचित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयापासून ते या चित्रपटातील बारिक डिटेलिंगचे कौतुक सोशल मीडियावर होत आहे. या चित्रपटातील अनेक सीन आणि त्यावर आधारित अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता सोशल मीडियावर एक नवा व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये चित्रपटातील क्लायमॅक्स पेक्षा वेगळा क्लायमॅक्स प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. जाणून घेऊयात हा नेमका कोणता क्लायमॅक्स आहे.

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय आहे. विशेषतः या चित्रपटातील क्लायमॅक्स सीन प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिला आहेत. या सीनमध्ये जसकीरत सिंग रंगी (Ranveer Singh) आपल्या कुटुंबाला भेटायला जाण्याचा प्रयत्न करताना दिसतो, मात्र परिस्थितीमुळे त्याला ते शक्य होत नाही. हा प्रसंग अत्यंत भावनिक असून प्रेक्षकांच्या मनावर गंभीर परिणाम करतो.

Dhurandhar 2
Dhurandhar 2: 'धुरंधर २' अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; बॉलिवूडमध्ये खळबळ, पाकिस्तान कनेक्शन उघड

दरम्यान, सोशल मीडियावर चाहत्यांनी या क्लायमॅक्सला वेगळे रूप दिले आहे. AI चा वापर करून ‘धुरंधर’च्या शेवट वेगळ्या पद्धतीने करण्यात आला आहे. या AI व्हर्जनमध्ये जसकीरत आपल्या कुटुंबाला पुन्हा भेटताना आणि आनंदाने एकत्र येताना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपटाला एक ‘हॅप्पी एंडिंग’ मिळाले आहे.

Dhurandhar 2
Famous Actor Death: प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड; गंभीर आजाराशी झुंज ठरली अपयशी

हा AI व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हर्जनचे कौतुक करत, जसकीरतसोबत असाच शेवट व्हायला पाहिजे होता असे मत व्यक्त केले आहे. मात्र, मूळ कथेत एक अंडरकव्हर स्पायच्या आयुष्यातील कठोर वास्तव दाखवले आहे. जसकीरतला आपल्या कुटुंबापासून दूर राहावे लागते आणि गुप्तहेर म्हणून त्याला परिवाराचा त्याग करावा लागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com