बीडमध्ये मैत्रीचा रक्तरंजित शेवट; पत्नीचे आक्षेपार्ह फोटो का दाखवले? म्हणत मित्राची निर्घृण हत्या

Beed Friend Murder Case Over Objectionable Photos: बीड जिल्ह्यातील बेलुरा येथे मित्रांनीच मित्राची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना. पत्नीचे आक्षेपार्ह फोटो दाखवल्याच्या रागातून गुन्हा; आरोपींमध्ये होमगार्डचा समावेश.
Police investigate the brutal murder scene in Belura village, Beed, where a man was allegedly killed by his own friends over a personal dispute.
Police investigate the brutal murder scene in Belura village, Beed, where a man was allegedly killed by his own friends over a personal dispute.saam tv
Published On

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड: 'माझ्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो का दाखवले? असा जाब विचारत चार मित्रांनी मिळून आपल्याच एका मित्राची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील बेलुरा येथे घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी चक्क एक होमगार्ड असल्याने जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Police investigate the brutal murder scene in Belura village, Beed, where a man was allegedly killed by his own friends over a personal dispute.
Crime News : ट्रेनच्या लोकोपायलटवर गोळीबार, दुचाकीवरून आले होते हल्लेखोर; हल्ल्याचे कारण धक्कादायक

मिळालेल्या माहितीनुसार, सुमित गवते असे मृत युवकाचे नाव आहे. आरोपी आणि सुमित हे एकमेकांचे मित्र होते. घटनेच्या दिवशी आरोपींनी सुमितला "तुझ्याकडे काम आहे" असे सांगून बोलावून घेतले. मात्र, तिथे पोहोचताच पूर्वनियोजित कटानुसार आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढवला.

Police investigate the brutal murder scene in Belura village, Beed, where a man was allegedly killed by his own friends over a personal dispute.
Pune Crime News: पुणे हादरलं! गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

फिर्यादीनुसार, गावातीलच रुस्तुम गोवर्धन गवते, ज्ञानेश्वर दत्ता लाटे, आणि खंबा लिंबा येथील सुरज नागरगोजे या तिघांनी सुमितला घट्ट धरून ठेवले. त्यानंतर गावातीलच त्याचा मित्र रितेश सतीश बहिर याने हातातील धारदार शस्त्राने सुमितच्या अंगावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात सुमितचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवत एका आरोपीला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. रुस्तुम गवते याच्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो सुमितने का दाखवले किंवा का पसरवले, या रागातून हा टोकाचा निर्णय घेतल्याचे आरोपीने सांगितले आहे.

Police investigate the brutal murder scene in Belura village, Beed, where a man was allegedly killed by his own friends over a personal dispute.
Mumbai News: बिर्याणीनंतर कलिंगड खाणं बेतलं जीवावर, एकाच कुटुंबातील ४ जणांचा संशयास्पद मृत्यू

या घटनेतील एका आरोपीचा संबंध होमगार्ड दलाशी असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रक्षकच जर भक्षक बनू लागले, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे? बीड जिल्ह्यात गुंडांवरील पोलिसांचा धाक संपला आहे का? असे संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com