Mumbai News: बिर्याणीनंतर कलिंगड खाणं बेतलं जीवावर, एकाच कुटुंबातील ४ जणांचा संशयास्पद मृत्यू

Mumbai food poisoning: मुंबईतील पायधुनी परिसरात अन्नातून विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली असून नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
Mumbai News
Mumbai Newssaam tv
Published On

दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे (Food Poisoning) एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला आहे. बिर्याणी खाल्यानंतर या कुटुंबाने कलिंगड खाल्लं होतं, जे त्यांच्या जीवावर बेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नेमकी घटना काय घडली?

मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पायधुनी परिसरात राहणाऱ्या या कुटुंबाची प्रकृती अचानक खालावली होती. मृत्यूपूर्वी कुटुंबातील एका व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, त्यांनी रात्रीच्या जेवणात आधी बिर्याणी खाल्ली होती आणि त्यानंतर काही वेळातच कलिंगडाचे सेवन केलं होतं. हे पदार्थ खाल्ल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. अन्नातून विषबाधा नेमकी कशामुळे झाली, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

बिर्याणी आणि कलिंगड यांचे मिश्रण घातक ठरले की त्यापैकी एखादा पदार्थ आधीच खराब झाला होता, याबाबतचा अहवाल फॉरेन्सिक लॅबकडून आल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे. एकाच घरातील चौघांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने पायधुनी परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com