Crime News : ट्रेनच्या लोकोपायलटवर गोळीबार, दुचाकीवरून आले होते हल्लेखोर; हल्ल्याचे कारण धक्कादायक

Jharkhand Tata Railway Station Loco Piolt Murder : जमशेदपूरमधील टाटानगर रेल्वे स्थानक परिसरात लोको पायलटची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
JAMSHEDPUR SHOCKER LOCO PILOT SHOT DEAD AT TATANAGAR RAILWAY STATION
JAMSHEDPUR SHOCKER LOCO PILOT SHOT DEAD AT TATANAGAR RAILWAY STATIONSaam Tv
Published On
Summary
  • टाटानगर स्थानक परिसरात लोको पायलटची गोळ्या झाडून हत्या

  • दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी केला हल्ला

  • जी. के. मीना यांचा जागीच मृत्यू

  • व्यावसायिक वादातून हत्या झाल्याची शक्यता

  • पोलिसांकडून सीसीटीव्ही तपास व आरोपींचा शोध सुरू

JAMSHEDPUR SHOCKER LOCO PILOT SHOT DEAD AT TATANAGAR RAILWAY STATION झारखंडमधील जमशेदपूर मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोहनगर शहरातील बागबेदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या टाटानगर रेल्वे स्थानक परिसरात रविवारी रात्री उशिरा घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात गुन्हेगारांनी एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या कपाळात गोळी झाडून त्याची निर्घृण हत्या केली. जी. के. मीना असे मृत पायलटचे नाव आहे. या घटनेनंतर स्थानक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जी. के. मीना रविवारी रात्री उशिरा रेल्वे लोको पायलट लॉबी गेटकडे जात होते. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना लक्ष्य करत जवळून गोळी झाडली. गोळी त्यांच्या कपाळात लागल्याने ते जागीच कोसळले. हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

JAMSHEDPUR SHOCKER LOCO PILOT SHOT DEAD AT TATANAGAR RAILWAY STATION
Shocking : नामंकित हॉटेलवर पोलिसांची रेड, रूमचा दरवाजा उघडताच तरुण- तरुणी नको त्या अवस्थेत सापडले

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि रेल्वे कर्मचारी घटनास्थळी जमा झाले. जखमी अवस्थेत मीना यांना तातडीने रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

JAMSHEDPUR SHOCKER LOCO PILOT SHOT DEAD AT TATANAGAR RAILWAY STATION
Mumbai : ५ रुपयांची बॉटल १० रुपयांना, पाण्याच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांची लूट; बोरिवली स्थानकावरील धक्कादायक प्रकार

दरम्यान, प्राथमिक तपासात जी. के. मीना हे रेल्वेतील कामासोबतच जमिनीचे व्यवहार आणि कंत्राटी कामांमध्येही सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे पार्किंग आणि स्थानक विस्ताराशी संबंधित कामांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यामुळे व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

JAMSHEDPUR SHOCKER LOCO PILOT SHOT DEAD AT TATANAGAR RAILWAY STATION
Shocking : मोडलेलं लग्न पुन्हा जुळवण्याचं दिलं वचन; नराधम महिलेच्या घरात शिरले, संधी साधून केलं हादरवणारं कृत्य

बागबेदा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. या घटनेमुळे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, नागरिकांनी कठोर सुरक्षा उपाययोजनांची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com