Shocking : नामंकित हॉटेलवर पोलिसांची रेड, रूमचा दरवाजा उघडताच तरुण- तरुणी नको त्या अवस्थेत सापडले

Uttar Pradesh Crime News : सहारनपूरमध्ये पोलिसांनी हॉटेल्सवर छापा टाकला. या हॉटेल्सवर तरुण तरुणी नको त्या अवस्थेत पोलिसांना सापडले असून सेक्स रॅकेट चालवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
SAHARANPUR HOTEL RAID SECRET CABINS SEX RACKET EXPOSED POLICE CRACKDOWN
SAHARANPUR HOTEL RAID SECRET CABINS SEX RACKET EXPOSED POLICE CRACKDOWNSaam Tv
Published On
Summary
  • सहारनपूरमध्ये हॉटेल्सवर पोलिसांचा छापा

  • गुप्त केबिन्स आणि अवैध प्रकार उघड

  • हॉटेल मालकांवर कारवाई सुरू

  • कडक नियम लागू; CCTV आणि नोंद अनिवार्य

  • शहरात खळबळ, व्यवसायिक सतर्क

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तक्रारीच्या आधारे शहरातील विविध हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर अचानक कारवाई करण्यात आली. या तपासादरम्यान अनेक ठिकाणी गुप्त केबिन्स तयार केल्याचे उघड झाले. या केबिनमध्ये तरुण आणि तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला असून सेक्स रॅकेट चालवला जात असल्याचा संशय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका हॉटेलमध्ये चुकीचे प्रकार घडत असल्याची माहिती पोलिसांना गुप्त माहितीदारांकडून मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी शहरातील मुख्य रस्ते आणि वस्त्यांमधील अनेक हॉटेल्स व रेस्टॉरंट्सची तपासणी करण्यात आली. या तपासात स्वतंत्र, पडद्यांनी झाकलेले केबिन्स आढळले. काही ठिकाणी अवैध हुक्का पार्लर देखील सुरू असल्याचे दिसून आले आणि अल्पवयीन मुलामुलींना हुक्का पुरवला जात असल्याचेही समोर आले. या केबीन्समध्ये तरुण तरुणी नको त्या अवस्थेत पोलिसांना सापडले.

SAHARANPUR HOTEL RAID SECRET CABINS SEX RACKET EXPOSED POLICE CRACKDOWN
Crime News : संतापजनक! शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीला एकट्यात गाठलं; ९वीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार

या प्रकरणानंतर पोलिसांनी सर्व हॉटेल व रेस्टॉरंट चालकांना कडक निर्देश दिले आहेत. कोणत्याही ठिकाणी गुप्त किंवा पडद्याने झाकलेले केबिन्स आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, बसलेल्या सर्व ग्राहकांचे चेहरे स्पष्टपणे दिसले पाहिजेत, अशी अट घालण्यात आली आहे. याशिवाय, शाळेच्या गणवेशात येणाऱ्या विद्यार्थ्यांना बंदिस्त जागेत बसण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांना फक्त खुल्या जागेतच बसण्याची परवानगी असेल आणि शाळेच्या वेळेत प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्व हॉटेल्सना ग्राहकांची नोंद व्यवस्थित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

SAHARANPUR HOTEL RAID SECRET CABINS SEX RACKET EXPOSED POLICE CRACKDOWN
Shocking : पोलिस अधिकाऱ्याकडून तरुणीवर बलात्कार, स्पर्धा परिक्षेच्या तयारीत मदत करतो म्हणाला, हॉटेलवर नेलं अन्....

पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे सतत सुरू ठेवणे अनिवार्य केले आहे. कॅमेरे बंद आढळल्यास संबंधित व्यवस्थापकावर जबाबदारी निश्चित केली जाईल. तसेच,ओळखपत्राच्या आधारे खोली देण्यासही बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, नियमांचे काटेकोर पालन करण्याची तयारी सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com