Crime News : संतापजनक! शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीला एकट्यात गाठलं; ९वीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार

Rajsthan Crime News : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात १५ वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल असून आरोपींचा शोध सुरू आहे.
ALWAR MINOR GIRL ABDUCTION CASE SHOCKS RAJASTHAN
ALWAR MINOR GIRL ABDUCTION CASE SHOCKS RAJASTHANSaam Tv
Published On
Summary
  • राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात धक्कादायक घटना

  • १५ वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून बलात्कार

  • या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

  • आरोपींचा शोध सुरू आहे.

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील एका गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारी शाळेत शिकणाऱ्या इयत्ता नववीतील १५ वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या भावाने तक्रार दाखल केल्यानंतर तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यापैकी दोघांची ओळख पटली आहे. सर्व आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे ८ वाजता नेहमीप्रमाणे पीडित मुलगी शाळेत जायला निघाली. शाळा जवळच असल्याने ती पायी चालत शाळेत जायची. घटनेच्या दिवशी देखील ती पायी चालत शाळेत जात असताना एक एसयूव्ही गाडी तिच्याजवळ थांबली. गाडीतून उतरलेल्या दोन आरोपींनी तिला जबरदस्तीने आत ओढले. त्यानंतर तिचे हात बांधण्यात आले आणि डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली. वाटेत त्यांनी आणखी एका व्यक्तीला सोबत घेतले आणि मुलीला एका अज्ञात ठिकाणी नेण्यात आले.

ALWAR MINOR GIRL ABDUCTION CASE SHOCKS RAJASTHAN
Mumbai : 'मला हिंदू मुली आवडतात...' अश्लील व्हिडिओ पाठवले, शारीरिक संबंधांची मागणी; नाशिकनंतर मुंबईत कॉर्पोरेट जिहाद

पीडितेच्या डोळ्यांवरील पट्टी काढल्यानंतर ती एका खोलीत असल्याचे तिच्या लक्षात आले. तेथे तिन्ही आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपींनी या कृत्याचे चित्रीकरण केल्याचेही समोर आले असून, ही बाब अधिक गंभीर मानली जात आहे. तसेच, कोणालाही याबाबत सांगितल्यास तिच्या भावाला ठार मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे सांगितले जाते.

ALWAR MINOR GIRL ABDUCTION CASE SHOCKS RAJASTHAN
Shocking : काकीसोबत पुतण्याचं सिक्रेट अफेअर! काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् भयंकर घडलं

दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी पुन्हा तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तिला अपहरण केलेल्या ठिकाणी आणून सोडले. त्या वेळी परिसरात ग्रामस्थांची गर्दी पाहून आरोपींनी आपले वाहन तेथेच सोडून पळ काढला. याप्रकरणी मुलीच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पीडितेने घडलेल्या घटनेचा जबाब पोलिसांना दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन अज्ञात गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, तसेच फरार आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षिततेचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com