Shocking : मोडलेलं लग्न पुन्हा जुळवण्याचं दिलं वचन; नराधम महिलेच्या घरात शिरले, संधी साधून केलं हादरवणारं कृत्य

Amravati Crime News : अमरावतीत मदतीच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांदगाव पेठ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
AMRAVATI WOMAN RAPE CASE TWO ACCUSED ARRESTED IN NANDGAON PETH
AMRAVATI WOMAN RAPE CASE TWO ACCUSED ARRESTED IN NANDGAON PETHSaam tv
Published On
Summary
  • अमरावतीत महिलेवर अत्याचाराची घटना

  • मदतीच्या बहाण्याने फसवणूक

  • दोन आरोपींना पोलिसांनी अटक

  • महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

AMRAVATI WOMAN RAPE CASE TWO ACCUSED ARRESTED IN NANDGAON PETH अमरावती जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ३५ वर्षीय महिलेवर मदतीच्या बहाण्याने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रियाजोद्दीन आणि वसीम या दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने सुमारे वर्षभरापूर्वी पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. त्यानंतर ती मानसिक तणावात होती. तिचे एका तरुणाशी लग्न ठरले होते, मात्र त्या तरुणाने तिचा मोबाईल क्रमांक ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्यामुळे दोघांमधील संपर्क तुटला होता. या परिस्थितीचा फायदा घेत आरोपी रियाजोद्दीन याने महिलेची ओळख वाढवली आणि “तुमचे तुटलेले नाते पुन्हा जुळवून देतो” असे सांगून तिचा विश्वास संपादन केला.

AMRAVATI WOMAN RAPE CASE TWO ACCUSED ARRESTED IN NANDGAON PETH
Political News : शिवसेनेत पुन्हा बंडाळी? विधानपरिषद निवडणुकीसाठी ८ जणांची नावे चर्चेत, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार?

यानंतर आरोपी महिलेच्या घरी गेला. त्या वेळी महिला घरी एकटीच असल्याचा फायदा घेत त्याने तिच्यावर जबरदस्ती करत तिच्यावर अत्याचार केले. या प्रकारानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. घटनेमुळे ती हादरून गेली होती. काही दिवसांनी स्वतःला संभाळत तिने नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

AMRAVATI WOMAN RAPE CASE TWO ACCUSED ARRESTED IN NANDGAON PETH
Shocking : नामंकित हॉटेलवर पोलिसांची रेड, रूमचा दरवाजा उघडताच तरुण- तरुणी नको त्या अवस्थेत सापडले

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रियाजोद्दीन आणि त्याचा साथीदार वसीम यांना अटक केली. या प्रकरणात आरोपींवर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. आरोपींनी आणखी कुणाला फसवले आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारच्या घटनांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून, अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, असेही सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com