Beed Accident CCTV Footage: ट्रक आणि दुचाकीची जोरदार धडक; नमाज पठण करून येणाऱ्या तरूणाचा जागीच मृत्यू

Truck Bike Accident: बीडमध्ये भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
Beed Accident CCTV
Beed Accident CCTV Saam Tv

विनोद जिरे साम टीव्ही, बीड

Beed Accident News

बीडच्या (Beed) तलवाडा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. तलवाडा गावात ट्रक आणि दुचाकीची जोरदार धडक (Truck Bike Accident) झाली. या भीषण अपघातात दुचाकीवरून नमाज पठण करून येणाऱ्या तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. (latest accident news)

बीड जिल्ह्यात नमाज अदा करून गावाकडे निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली. त्यामुळे या तरूणाचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या तलवाडा गावात घडली (Beed Accident CCTV) आहे. युनूस शेख (वय 32, रा. बणेवाडी ता. गेवराई) असं अपघातात ठार झालेल्या तरुणाचं नाव आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघातानंतर ट्रक चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अपघातानंतर पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला जमावाने पकडलं. त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. मन हेलावून टाकणाऱ्या या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला (Talwada) आहे. हा व्हिडिओ आता समोर येत आहे.

मयत युनूस नमाज अदा करून दुचाकीवरून गावाकडे निघाला होता. या दरम्यान समोरून येणाऱ्या ट्रकने युनूसच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात शेख युनूसचा जागीच मृत्यू (Beed Accident News) झाला. घटना घडताच ट्रक चालक पळून जात असताना त्याला जमावाने पकडले. दरम्यान या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आलंय. बीड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Beed Accident CCTV
Sangli Accident : सांगलीत भीषण अपघात; भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, ४ ऊसतोड मजुरांचा मृत्यू

रमजान सुरू असल्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अगदी सणाच्या तोंडावर ही दुख:द घटना घडली आहे. युनूसच्या मृत्यूमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात (Accident News) आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक भरधाव रस्त्यावर एका ट्रकने दुचाकीला धडक दिली आहे. यामध्ये दुचाकीवरून तरूण खाली पडला अन् त्याचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Beed Accident CCTV
Chandrakant Patil Accident: मोठी बातमी! मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com