Road Accident: भयंकर अपघात! डंपरच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; ५ मृत्यू; ३ गंभीर

Chitrakoot Road Accident: चित्रकूटमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने ऑटो रिक्षाला धडक दिली आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय, तर तिघांची प्रकृती गंभीर आहे.
Chitrakoot Road Accident
Chitrakoot Road AccidentGoogle

Dumper Auto Accident On Chitrakoot Road

उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये (Chitrakoot) एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणारा डंपर आणि ऑटो यांची जोरदार धडक झाली. या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले (Road Accident) आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना प्रयागराज येथे रेफर करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या अपघातात ऑटोचा चक्काचूर झाला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

(latest accident news)

जिल्हा रुग्णालयाचे सीएमएस डॉ. आरबी लाल यांनी टीव्ही नाईनला दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर आठ जणांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला (Chitrakoot Road Accident) आहे. अन्य तीन जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना प्रयागराज येथे रेफर करण्यात आलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑटोमध्ये चालकासह एकूण आठ जण असल्याची माहिती मिळत आहे. या मृतांमधील तीन मृतदेहांची ओळख पटलेली आहे. यातील दोन मृत व्यक्ती कन्नौजचे रहिवासी आहेत (Dumper Auto Accident) आणि एक हमीरपूरचा रहिवासी आहे. पोलीस इतर दोघांची ओळख पटवत आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे. पहाटे झालेल्या या अपघातामुळे एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी ऑटोमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढून रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं.

चित्रकूट कोतवाली परिसरात झाशी-मिर्झापूर राष्ट्रीय महामार्गावरील अमनपूरजवळ हा अपघात झाला. आज सकाळी (२ एप्रिल) भरधाव वेगात आलेल्या डंपरने प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोला धडक (Accident News) दिली. ऑटोमधील पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झालेला आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी ऑटोमध्ये अडकलेल्या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढलं होतं. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. जखमी झालेल्या तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिसांनी अपघाताची माहिती मृताच्या नातेवाईकांना दिली. याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली होती. कुटुंबीय चित्रकूटला रवाना झाल्याची माहिती मिळत (Uttar Pradesh News) आहे. पोलिसांनी मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयाच्या शवागारात ठेवले आहेत. या घटनेमुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवून हा ट्राफिक जाम मोकळा केला आहे.

Chitrakoot Road Accident
Beed Accident: लग्नाचा बस्ता बांधून निघालेल्या नवरदेवासह बहीण आणि भाचीचा अपघाती मृत्यू, बीडमधील हृदयद्रावक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com