Beed Accident: लग्नाचा बस्ता बांधून निघालेल्या नवरदेवासह बहीण आणि भाचीचा अपघाती मृत्यू, बीडमधील हृदयद्रावक घटना

Accident On Ambajogai Latur Highway: अंबाजोगाई-लातूर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. एसटी बस आणि दुचाकीच्या भीषण अपघात तिघांचा जागीत मृत्यू झाला आहे.
Beed Accident
Beed AccidentSaam Tv

विनोद जिरे साम टीव्ही, बीड

ST Bus Bike Accident In Beed

बीडमध्ये (Beed) अंबाजोगाई लातूर महामार्गावर (Ambajogai Latur Highway) अपघाताची मालिका सुरूच आहे. एसटी बस आणि दुचाकीच्या भीषण अपघात तिघांचा जागीत मृत्यू झाला आहे. लग्नाचा बस्ता बांधून निघालेल्या नवरदेवासह बहीण आणि भाची असा तिघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. सेवालाल पंडित राठोड (वय 21 वर्ष), बहीण दिपाली सुनील जाधव (वय 20) आणि भाची त्रिशा सुनील जाधव (वय 1 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. (latest accident news)

मिळालेल्या माहितीनुसार, सेवालालचं महिनाभरानंतर लग्न होतं. त्यासाठी सर्वजण लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी गेले होते. तिथून बहीण आणि चिमुकल्या भाचीसह गावाकडे निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला एसटी बसने जोराची धडक (Beed Accident) दिली. या भीषण अपघातात भावी नवरदेव तरुणासह त्याची बहीण आणि भाचीचा जागीच मृत्यू झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

येत्या 28 एप्रिल रोजी सेवालालचा विवाह होणार होता. या विवाहाची सध्या जय्यत तयारी सुरू (Accident On Ambajogai Latur Highway) होती. लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी सेवालाल बीडच्या राडी तांडा येथे राहणाऱ्या बहीण दिपाली सुनील जाधव आणि एक वर्षाची भाची त्रिशा यांना घेऊन अंबाजोगाईला आला होता. लग्नाचा बस्ता बांधून बहीण आणि भाचीला घेऊन सेवालाल हा काल सायंकाळी दुचाकीवरून गावाकडे परत निघाला होता.

वाघाळा पाटीजवळ समोरून येणाऱ्या लातूर-छत्रपती संभाजीनगर बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक (ST Bus Bike Accident In Beed) दिली. अंबाजोगाई - लातूर महामार्गावरील बीडच्या वाघाळा पाटीजवळ हा अपघात झालाय. या भीषण अपघात तिघांचा जागीत मृत्यू झाला आहे.

Beed Accident
Accident Video: भयानक! कार गरकन फिरुन उलटली अन् चालक चेंडूसारखा हवेत.. थरारक अपघाताचा VIDEO

भीषण अपघातात बसखाली दुचाकी फरफटत जाऊन सेवालाल, बहीण दिपाली आणि भाची त्रिशा यांचा जागीच मृत्यू (Accident News) झाला. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी स्वाराती रुग्णालयात धाव घेतली होती. एकाच वेळी तिघांच्या मृत्यूने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Beed Accident
Bhandara Accident : भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नी ठार, घटनेनं अख्खं गाव हळहळलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com