Beed Accident
Beed AccidentSaam tv

Beed Accident : धावत्या कारचे टायर निखळल्याने २ कारचा भीषण अपघात; ५ जण गंभीर जखमी

Beed News : बीड- लातूर राष्ट्रीय महामार्गावर वेगाने जात असलेल्या कारचे पाठीमागचे चाक रॉड तुटल्याने बाहेर निघाले
Published on

बीड : भरधाव वेगाने जात असलेल्या गाडीचे टायर निखळल्याने दोन कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील ५ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. हा (Accident) अपघात (Beed) बीडच्या मस्साजोग गावाजवळ सायंकाळच्या सुमारास घडली. (Latest Marathi News)

Beed Accident
Navneet Rana News: नवनीत राणा यांच्या भाजपा प्रवेशानंतर आमदार बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया; महायुतीला दिला थेट इशारा

बीड- लातूर राष्ट्रीय महामार्गावर वेगाने जात असलेल्या कारचे पाठीमागचे चाक रॉड तुटल्याने बाहेर निघाले. यामुळे हे चाक समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारवर आदळल्याने दोन्ही गाड्या रस्त्याच्या बाजूला पलटी झाल्या. यामुळे गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले असून कारमधील ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. कारमध्ये अडकलेल्याना बाहेर काढण्यात आले. दरम्यान जखमींवर (Kej) केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed Accident
Chilli Farming : पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकऱ्यांची आधुनिक शेती; मिरची लागवड करत भरघोस उत्पादन

सुदैवाने जीवितहानी टळली 

भरधाव वेगाने असलेल्या कारचे चाक फुटून व निघाल्याने अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी अनेक घडल्या आहेत. मात्र बी- लातूर महामार्गावर झालेल्या या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दोन्ही कार पलटी होऊन यात कारमधील प्रवाशी जखमी झाले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com