Ambajogai Nagarpalika : पाणीपट्टी न भरल्याने अंबाजोगाई बिगर सिंचन योजनेचा पाणी पुरवठा बंद; ऐन उन्हाळ्यात नागरिकांना त्रास

Beed News : अंबाजोगाई बिगर सिंचन योजनेच्या पाणीपुरवठ्याचे ५ कोटी १४ लाख थकीत आहेत. यामुळे पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. नगरपालिकेकडे मागील काही वर्षांपासून पाणी पट्टीची रक्कम थकीत ठेवली आहे.
Ambajogai Nagarpalika
Ambajogai NagarpalikaSaam tv
Published On

बीड : दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अर्थात या दुष्काळात अंबाजोगाईकरांवर दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे. कारण अंबाजोगाई नगरपालिकेने पाणीपट्टी बिल न भरल्याने (Beed) बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या धनेगाव येथील मांजरा धरणातून (Manjra Dam) अंबाजोगाईचा बिगर सिंचन योजनेचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. यामुळे नागरिकांना पाण्याची नाहक समस्या जाणवत आहे. (Tajya Batmya)

Ambajogai Nagarpalika
Dharashiv Medical Collage : वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना नोटीसा; कार्यालयीन वेळेत राहतात गायब

अंबाजोगाई (Ambajogai) बिगर सिंचन योजनेच्या पाणीपुरवठ्याचे ५ कोटी १४ लाख थकीत आहेत. यामुळे पाणीपुरवठा (Water Supply) खंडीत करण्यात आला आहे. नगरपालिकेकडे मागील काही वर्षांपासून पाणी पट्टीची रक्कम थकीत ठेवली आहे. विशेष म्हणजे अंबाजोगाई नगरपालिकेने या वर्षात अवघे ५ लाख ७० हजार ४५६ रुपये बील भरले आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंत्यांनी अंबाजोगाई नगरपालिकेला ७ मार्च २०२४ ला नोटीस जारी करून १५ मार्चपर्यंत थकीत ५ कोटी १४ लाख रुपये पाणीपट्टी भरण्याचे सांगितले होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ambajogai Nagarpalika
Sambhajinagar Airport : संभाजीनगरमधून आता थेट सिंगापूर, बँकॉकसाठी विमान सेवा

नोटीसकडे केले दुर्लक्ष 

मात्र सदरच्या नोटीसला अंबाजोगाई नगरपालिकेने गांभीर्याने घेतले नाही. आणि नोटिशीनुसार सदरची थकीत पाणीपट्टीची रक्कम भरण्यास दुर्लक्ष केले. यामुळे बिगर सिंचन योजनेचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. दरम्यान या नगरपालिकेच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांना मात्र आता पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com