Bhandara Accident : भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नी ठार, घटनेनं अख्खं गाव हळहळलं

Car and Bike Accident : पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गावर कार पती-पत्नी दुचाकीवरून जात होते. अपघातात भोजराम कोल्लू राणे (५५) तर रत्ना भोजराम राणे
Bhandara Accident
Bhandara AccidentSaam TV

Bhandara :

भंडाऱ्यातून एक दु:खद घटना समोर आली आहे. कारची दुचाकीला धडक बसल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत. तुमसर मार्गावरील खापा येथील घटना असून पती-पत्नीच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.

Bhandara Accident
Bhandara Accident News : भंडा-यात भीषण अपघात, दुचाकीस्वार हवेत उडून कारच्या छतावर काेसळला; चिमुकलीसह दाेघे गंभीर जखमी

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गावर कार पती-पत्नी दुचाकीवरून जात होते. अपघातात भोजराम कोल्लू राणे (५५) तर रत्ना भोजराम राणे (५०) रा.सालई खुर्द अशी मृतकांची नावे आहेत. तुमसर तालुक्यातील सालई खुर्द येथील भोजराम राणे आपल्या पत्नी रत्ना यांच्यासह मोटारसायकलने तुमसर येथे एका नातेवाईकाकडे गेले होते.

त्यांना भेटून आपल्या गावाकडे परत जात असताना खापा शिवारात विरूद्ध दिशेने येणाऱ्या कारच्या चालकाने कार निष्काळजीपणे चालवून ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न केला. ओव्हरटेक करताना मोटारसायकलला धडक बसली. यात दुचाकीस्वार पती-पत्नी गंभीर जखमी झाले.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पती-पत्नी दोघांनाही उपचाराकरीता उपजिल्हा रूग्णालय तुमसर येथे पाठविण्यात आले. परंतू जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने पती-पत्नी दोघांनाही पुढे भंडाऱ्याला हलविण्यात आले. येथे पतीचा मृत्यू झाला. तर पत्नीला पुढे नागपुरला नेण्यात आले तेव्हा वाटेतच त्यांचीही प्राणज्योत मालवली.

पती-पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्याने सालई खुर्द येथे शोककळा पसरली आहेच. तुमसर पोलिसांनी कार चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे तसेच पुढील कारवाई सुरू आहे.

Bhandara Accident
Viral Video : कलिंगडाच्या बिया काढण्यासाठी सिंपल ट्रिक्स; देसी जुगाड सोशल मीडियावर व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com