Bhandara Accident News : भंडा-यात भीषण अपघात, दुचाकीस्वार हवेत उडून कारच्या छतावर काेसळला; चिमुकलीसह दाेघे गंभीर जखमी

दुचाकीस्वार हवेत उडाला आणि कारच्या छतावर पडला.
two injured along with kid in car two wheller accident near bhandara
two injured along with kid in car two wheller accident near bhandara saam tv

- शुभम देशमुख / अजय सोनवणे

Bhandara :

भंडारा जिल्हयात कार दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दाेन जण जखमी झाले. यामध्ये एका लहान मुलीचा समावेश आहे. या सहा वर्षाची मुलगी प्रकृती गंभीर झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी: रात्रीच्या सुमारास जवाहरनगरकडून पेट्रोलपंप ठाणा येथे येत असलेल्या कारला परसोडीकडून जवाहरनगर येथे निघालेल्या दुचाकीस्वाराने धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार हवेत उडाला आणि कारच्या छतावर पडला.

two injured along with kid in car two wheller accident near bhandara
Gondia : शासकीय धान खरेदीला ३१ पर्यंत मुदतवाढ

अपघातग्रस्त कारची काच फुटली तसेच कार मधील सहा वर्षाची मुलगी गंभीररित्या जखमी झाली. दरम्यान पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दुचाकीस्वार दुर्गेश लांजेवार हा देखील गंभीर जखमी असून त्यास भंडारा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

मळूबाई घाटानजीक बेवारस कार आढळली

नांदगाव- येवला मार्गावर मळूबाई घाटाच्या पुढे रस्त्यात पाेलिसांना एक कार बेवारस स्थितीत आढळून आली. या कारच्या ड्रायव्हर साईडला हँण्डल जवळ रक्ताचे डाग आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या कारमध्ये दोन मोबाईल आढळून आले आहेत. ही कार नांदगाव येथील असल्याची माहिती येवला पोलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

two injured along with kid in car two wheller accident near bhandara
Lok Sabha Election 2024 : मोदी शहांच्या विरोधात लढणार मराठा, मालेगावमध्ये नाव निश्चित

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com