Accident Video: भरधाव वेगातील टॅंकर उलटला, महामार्गावर भीषण स्फोट; अपघाताचा VIDEO व्हायरल

Oil Tanker Accident On Highway: महामार्गावर टॅंकरचा भीषण स्फोट झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टॅंकर रस्त्याच्या मधोमध उलटून त्याचा भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.
Oil Tanker Accident On Highway
Oil Tanker Accident On HighwaySaam Tanker
Published On

Tanker Accident On Highway Shocking Video

महामार्गावर जात असताना अचानक एका ऑईल टँकरचा अपघात (Tanker Accident) झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या टॅंकरचा मोठा स्फोट होऊन रस्त्यावर मोठा गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. रस्त्यावरून वाहने ये-जा करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. महामार्गावर टॅंकरचा भीषण स्फोट झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टॅंकर रस्त्याच्या मधोमध उलटून त्याचा भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.

(latest accident news)

दुतर्फा रहदारी असताना एक ऑईल टॅंकर महामार्गावर भरधाव वेगात आला. तो मोठा ऑईल टँकर अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन भरधाव वेगाने रस्त्याच्या मधोमध आदळला अन् तिथेच (Accident Video) उलटला. टॅंकर उलटल्यानंतर मोठा स्फोट झाला. टॅंकर पूर्णपणे पेटल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. रस्त्यावर धुराचे मोठे लोट पसरले होतेय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या अपघातात अन्य किती वाहनांना ऑईल टँकरने धडक दिलीय, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. तसंच हा अपघात कुठे झाला याची माहिती देखील मिळू शकलेली (Oil Tanker Accident) नाही. हा अपघाताचा व्हिडिओ X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @abruptvideo नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'एका क्षणात सर्वकाही बदलू शकतं, क्षणात सगळं काही संपुष्टात येऊ शकतं', असं लिहिलेलं आहे. अपघाताचा हा व्हिडिओ दहा सेकंदाचा (viral) आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 54 हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केलं आहे. या अपघाताचा व्हिडिओ भरधाव वेगात व्हायरल (accident news) होतोय.

Oil Tanker Accident On Highway
Beed Accident: लग्नाचा बस्ता बांधून निघालेल्या नवरदेवासह बहीण आणि भाचीचा अपघाती मृत्यू, बीडमधील हृदयद्रावक घटना

रस्त्यावर अपघात होणं, यामध्ये काही विशेष नाही. अशा घटना नेहमीच घडत असतात. काही अपघात भयंकर असतात, तर काही घटना सामान्य (viral news) असतात. अनेकवेळा या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी घडल्याचं समोर येतं. असाच एक तेलाच्या टॅंकरचा भीषण अपघात झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय. हा अतिशय भीषण अपघात (viral video) आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी विविध प्रकारच्या कमेंट्स देखील केल्या आहेत.

Oil Tanker Accident On Highway
Nashik Accident News : यात्रेला निघालेल्या महिलेचा वाटेतच मृत्यू; देवदर्शनाआधीच भरधाव वाहनाची जोरदार धडक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com