Sangli
Sangli Saam tv

Sangli Accident : सांगलीत भीषण अपघात; भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, ४ ऊसतोड मजुरांचा मृत्यू

Sangli Accident update : सांगलीतून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. सांगलीत ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
Published on

Sangli Road Accident :

सांगलीतून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. सांगलीत ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ जण जखमी झाले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेने रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात रस्ते अपघातांचे सत्र सुरुच आहे. सांगलीतही भीषण अपघाताची घटना घडली. सांगली-सोलापूर महामार्गावर सोमवारी मध्यरात्री ही अपघाताची घटना घडली. ऊसतोड मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर आणि भरधाव ट्रकचा सांगली-सोलापूर महामार्गावर अपघात झाला.

Sangli
Accident Video: भरधाव वेगातील टॅंकर उलटला, महामार्गावर भीषण स्फोट; अपघाताचा VIDEO व्हायरल

या भीषण अपघातात दुर्दैवाने चार ऊसतोड मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींना तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातामधील मृतांमध्ये दोन महिला , एका मुलगा आणि लहान मुलीचा समावेश आहे.

Sangli
Chandrakant Patil Accident: मोठी बातमी! मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात

नेमका अपघात कसा झाला?

सांगली सोलापूर महामार्गावर ऊसतोड मजुरांचा ट्रॅक्टर सोमवारी मध्यरात्री जात होता. या ट्रॅक्टरमध्ये १० हून अधिक ऊसतोड कामगार आणि त्यांची मुले होती. सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यातील चिकलगी भुयार येथील ऊसतोड कामगार असल्याची माहिती मिळत आहे. ते काम आटोपून परतत असताना सांगली-सोलापूर महामार्गावर अपघात झाला.

सांगली-सोलापूर महामार्गावरून जाणाऱ्या या ट्रॅक्टरला मागून ट्रकने जोरात धडक दिली. या दुर्दैवी अपघातात ४ मुजरांचा मृत्यू झाला आहे. तर काही मजूर जखमी झाले. या जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com