Ballot Paper: मारकडवाडीत बॅलेटसाठी बॅटल, शरद पवार- राहुल गांधी मारकडवाडीत धडकणार

Ballot Paper: ईव्हीएमवर संशय घेत मतपत्रिकेवर फेरमतदान घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मारकडवाडीतील ग्रामस्थांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
Sharad Pawar And Rahul Gandhi
Sharad Pawar And Rahul Gandhiyandex
Published On

ईव्हीएमवर संशय घेत मतपत्रिकेवर फेरमतदान घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मारकडवाडीतील ग्रामस्थांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे शरद पवार मारकडवाडीला भेट देणार आहेत. त्यामुळे राजकारण पेटलंय.

मारकडवाडीने ईव्हीएमविरोधात पुकारलेल्या एल्गाराला आता महाविकास आघाडीचं बळ मिळणार आहे. मारकडवाडीत मतपत्रिकेवर फेरमतदान घेण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आमदार उत्तम जानकर आणि 200 पेक्षा अधिक ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता शरद पवार आणि जयंत पाटील हे 8 डिसेंबरला मारकडवाडीला जाणार आहेत. तर मविआसह राहुल गांधीही मारकडवाडीत लाँग मार्च काढण्याचा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलाय.

Sharad Pawar And Rahul Gandhi
Rohit Pawar: ...तर आम्ही राजीनामा देऊ; आमदार रोहित पवार आक्रमक, EVM वरून राजकारण तापलं!

दुसरीकडे पवार दाखल होण्यापुर्वीच मारकडवाडीत फडणवीसांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकवलेत. तर मी केलेली कामं पाहण्यासाठी शरद पवार मारकडवाडीत येणार असल्याचा खोचक टोला राम सातपुतेंनी मारलाय. नेमकं काय म्हणाले आहेत राम सातपुते?

Sharad Pawar And Rahul Gandhi
Ladki Bahin Yojana : 'या' महिलांचा अर्ज बाद होणार! कोणत्या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाही हा लाभ लगेच चेक करा

3 डिसेंबरला फेरमतदान घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मारकडवाडीत आता फडणवीसांचे बॅनर झळकल्याने ईव्हीएमविरोधातील आंदोलनात फूट पडल्याची चर्चा रंगलीय. मात्र देशभरात पहिल्यांदाच मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मारकडवाडीत ईव्हीएमविरोधात ठिणगी पडली. त्यामुळे मारकडवाडीतील ठिणगीचा वणवा देशभर पेटणार का? आणि निवडणूक आयोग विरोधकांची मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी मान्य करणार का? याकडे लक्ष लागलंय.

Sharad Pawar And Rahul Gandhi
Nashik: खेळताना चिमुकलीने गिळलं एक रुपयांचं नाणं; कुटुंबींयांकडे पैसे नसल्यानं उपचाराचासाठी परवड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com