Ladki Bahin Yojana : 'या' महिलांचा अर्ज बाद होणार! कोणत्या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाही हा लाभ लगेच चेक करा

Ladki Bahin Yojana : ज्या महिलांचे अर्ज बाद होतील त्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं ते म्हणाले.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana yandex
Published On

माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल पण तुम्हाला योजनेअंतर्गत ३००० रुपये मिळाले नसतील तर काही गोष्टी करणं हे महत्त्वाचं आहे. कारण त्यानंतरच तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणे सुरू होईल.माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज स्वीकारले गेले आहेत आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना पैसे पाठवण्यात आले आहेत. तेव्हापासून आता राज्यभरातील महिला डिसेंबरचा हप्ता कधी येणार याची वाट पाहत आहेत.

माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत राज्यातील महिलांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून दरमहा १५०० रुपयांच्या आर्थिक मदतीची तरतूद ही शिंदे सरकारकडून राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आली होती. २८ जून २०२४ पासून ही योजना राज्यात लागू करण्यात आली. या योजनेने भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे निवडणूक विश्लेषकांचे मत आहे.

Ladki Bahin Yojana
Vande Bharat: वंदे भारत स्लीपर कोचची लवकरच होणार चाचणी, 'या' महिन्यापासून करता येणार प्रवास

बीजेपीचे नेता सुधीर मुनगंटीवार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या गोष्टीला दुजोरा दिला आहे. लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मिळणारे पैसे १५०० वरुन २१०० होतील का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, १०० टक्के पैसे वाढवून मिळतील. तसंच ही योजना देखील चालू राहील.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीला पुढचा हफ्ता कधी मिळणार? शपथविधी सोहळ्यात होऊ शकते मोठी घोषणा

या दरम्यान सुधिर मुनगंटीवार हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट बोलले आहे. ते म्हणाले की, ज्या महिलांचे अर्ज बाद होतील त्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं ते म्हणाले. यात कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही याविषयीही ते बोलले. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा लाडक्या बहिणींना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. तसंच ज्या महिला कर भरतात त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Ladki Bahin Yojana
Nashik: खेळताना चिमुकलीने गिळलं एक रुपयांचं नाणं; कुटुंबींयांकडे पैसे नसल्यानं उपचाराचासाठी परवड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com