

अशोक खरात प्रकरणात १२ गुन्हे दाखल
एसआयटी आणि ईडीकडून सखोल तपास सुरू
मुख्यमंत्र्यांचा दोषींवर कडक कारवाईचा इशारा
महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राजाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अनेक राजकीय नेते, मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांचे या प्रकरणातील कनेक्शन उघड झाले आहे. नाशिक पोलिस आणि एसआयटीकडून सध्या या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. या प्रकरणाचे एकएक धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. नाशिकमध्ये या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरात प्रकरणात जे कुणी सहभागी आहे त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाणार, असा इशारा दिला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, 'भोंदू अशोक खरात प्रकरणात १२ गु्न्हे दाखल झाले आहेत. रोज नवीन माहिती समोर येत आहे. आता एसआयटी काय तपास करत आहे हे रोज सांगता येणार नाही. एसआयडी त्यासंदर्भातील माहिती योग्यवेळी सांगेल. सर्वांनी एसआयटीवर विश्वास ठेवावा. एसआयटी योग्य पद्धतीने काम करत आहे. या प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी केली जाणार आहे. ईडीने यासंदर्भातील माहिती घेऊन कारवाई सुरू केली आहे. सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. तपास यंत्रणांनाच हा अधिकार आहे.
या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'अशोक खरात प्रकरणात सीडीआर कशापद्धतीने लीक झाला, सीडीआर कुणी लीक केला याची चौकशी राज्य सरकार करेल. अशाप्रकारच्या सेन्सेटिव्ह प्रकरणात आरोप-प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्याविरोधात सबळ पुरावा असेल त्यांच्याविरोधात कारवाई होईल. अशोक खरातने केलेल्या घाणेरड्या कामात जे कुणी सहभागी असेल त्याला आम्ही सोडणार नाही. या प्रकरणात जो कुणी असेल त्याला सोडले जाणार नाही. तसंच कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही.'
तसंच, 'अशोक खरात प्रकरणात कसून चौकशी सुरू आहे. अशोक खरातची संपूर्ण संपत्ती, त्याचे सर्व गैरव्यवहार आणि त्याने ज्या प्रकारे महिलांवर अत्याचार केले या सर्व प्रकरणाचा खोलात जाऊन तपास करत त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. अशोक खरातला कडक शिक्षा दिली जाईल. यासंबंधी महाराष्ट्रातील सर्वजणांचे एकमत आहे. या प्रकरणात काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही या राजकारणाकडे दुर्लक्ष करतो. जे कार्य सरकारला करायचे आहे ते आम्ही करत आहोत.', असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.