Ashok Kharat Case : अशोक खरातच्या हवाला रॅकेटचं दुबई कनेक्शन? मोबाईलमधून बाहेर येणार खरातची 'कुंडली', वाचा खास रिपोर्ट

ashok Kharat news : खरातच्या मोबाईल डेटामधून हवाला रॅकेटचं थेट दुबई कनेक्शन समोर आलयं... त्यामुळे खरात दुबईत हवाला रॅकेट कसं चालवायचा... ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी खरातनं काय शक्कल लढवली होती... खरातच्या हवाला रॅकेटमध्ये कोणाचा सहभाग होता... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
ashok Kharat news
ashok Kharat news Saam Tv
Published On

भोंदूगिरी, राजकीय नेत्यांशी साटंलोटं आणि आता थेट 'हवाला'चं रॅकेट... नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे एकामागून एक धक्कादायक कारनामे समोर येतायत. अशातच एसआयटीच्या हाती लागलेल्या मोबाईल डेटामधून आता या प्रकरणाचे धागेदोरे थेट दुबईपर्यंत पोहोचलेत. श्रद्धेच्या नावाखाली हा भोंदू काळा पैसा पांढरा करण्यासाठी दुबईत कोणासोबत हवाला रॅकेट चालवत होता ते पाहूयात...

खरातच्या दोन मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यात आलाय..पहिल्या मोबाईलमधून राज्यातील बड्या राजकीय नेत्यांसोबतचे खरातचे संबंध समोर आलेले असताना दुसऱ्या फोनमध्ये खरातच्या हवाला रॅकेटचं दुबई कनेक्शन समोर आलयं... एका सीएकडे खरात 10 तासांपेक्षा अधिक वेळ पूजा करत असल्याचा व्हिडिओ या मोबाईलमध्ये सापडलाय... त्यात भारतात आणि दुबईत सराफा व्यवसायात बस्तान बसवलेल्या एका व्यवसायिकाचा सहभाग असल्याचं तपासात समोर आलयं..

. हाच सराफ व्यावसायिक सोन्याचे हॉलमार्क करणाऱ्या कंपनीचा मालक आहे...याच्याच मार्फत खरात हवाला रॅकेट चालवित असल्याचा संशय आहे. खरात काळे पैसे पांढरे करण्याचा धंदा या सराफ व्यापाऱ्यासह अन्य व्यापाऱ्यांच्या माध्यमातून करत असल्याची शक्यता आहे...

ashok Kharat news
Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं कनेक्शन उघड

दरम्यान भक्तांना खरात केवळ आशीर्वाद देत नव्हता, तर तो भक्तांच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम करायचा. "तुमच्यावर संकट आहे, तुमच्या जिवाला धोका आहे," असं सांगून तो भक्तांना तब्बल 10-10 तास पूजेला बसवायचा. या पूजेनंतर ग्रहांची शांती करण्यासाठी लाखो रुपयांच्या अंगठ्या आणि महागडे खडे खरेदी करण्यास भाग पाडायचं. त्यामुळे हा केवळ अंधश्रद्धेचा बाजार नव्हता, तर कोट्यवधींच्या वसुलीचा धंदा त्यानं मांडला होता.

ashok Kharat news
Ashok Kharat Case: आता खरातला EDचा दणका बसणार? खरातचं 'हवाला' कनेक्शन उघड?

त्यामुळे राजकीय वरदहस्त, दुबईतील सराफ मित्र आणि सावकारी माफिया यांच्या जोरावर खरातने हे मायाजाल विणलं होतं. त्यामुळे खरातच्या मोबाईल डेटामुळे हवाला रॅकेटमधील आणखी किती बडे मासे गळाला लागणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com