शिक्षक-पदवीधर निवडणुकीत पहिलं बंडाचं निशाण; शिंदेसेनेत उफाळली नाराजी, निष्ठावंतानं भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

Amravati Teachers Constituency Poll: अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत श्रीकांत देशपांडे यांनी पक्षाच्या अर्जासोबत अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास तरी देखील निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Shinde Sena Shrikant Deshpande rebellion over Amravati Teachers Constituency ticket
Shinde Sena Shrikant Deshpande rebellion over Amravati Teachers Constituency ticketsaam tv
Published On: 

अमर घटारे, साम टीव्ही

शिंदेसेनेचे नेते आणि माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महायुतीकडून अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नसतानाच देशपांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीमध्ये बंडाची चिन्हे दिसू लागली आहेत. उमेदवारी नाकारली तरी निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट करत, ‘शिक्षक आघाडी’च्या बॅनरखाली निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Shinde Sena Shrikant Deshpande rebellion over Amravati Teachers Constituency ticket
Pune Politics: अर्ज सुरू, फिल्डिंग जोरात; पण ‘तो’ उमेदवार कोण? पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मोठा ट्विस्ट

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीमध्ये बंडाचे संकेत मिळत आहेत. महायुतीकडून अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर झालेला नसतानाच, शिंदेसेनेचे नेते आणि माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

Shinde Sena Shrikant Deshpande rebellion over Amravati Teachers Constituency ticket
Political News: माजी मंत्र्यांची मुलगी निवडणुकीच्या रिंगणात, शिक्षक मंतदार संघ निवडणुकीत मोठी अपडेट

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना श्रीकांत देशपांडे म्हणाले, मी 1992 पासून शिवसेनेत कार्यरत आहे आणि पहिल्या दिवसापासून शिंदेसेनेसोबत आहे. त्यामुळे पक्षाच्या तिकिटावर माझाच पहिला अधिकार आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी एक अर्ज पक्षाच्या वतीने, तर दूसरा अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे. पक्षाने उमेदवारी नाकारली तरी मी निवडणुकीतून माघार घेणार नाही. उमेदवारी मिळणे हा माझा हक्क आहे. ती मिळाली नाही तर ‘शिक्षक आघाडी’च्या बॅनरखाली निवडणूक लढवेन, असा ठाम निर्धार श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केला.

Shinde Sena Shrikant Deshpande rebellion over Amravati Teachers Constituency ticket
Vidhan Parishad Election: महायुतीनं उमेदवारी नाही दिली तर आम्ही देऊ; मंगेश चिवटेंना कोणी दिली ऑफर?

तसेच विरोधकांवर आणि सध्या सुरू असलेल्या मोफत साड्या वाटपाच्या मुद्द्यावरही देशपांडे यांनी निशाणा साधला. साड्या-चोळ्या वाटणारे वाटतील आणि घेणारे घेतील. पण शिक्षक मतदार अत्यंत सुज्ञ आहे. तो यावेळी ताकही फुंकून पिणार आहे, असा टोला त्यांनी लगावला. श्रीकांत देशपांडे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी कमालीची वाढली आहे.

Shinde Sena Shrikant Deshpande rebellion over Amravati Teachers Constituency ticket
महाराष्ट्रातील कॉलेजमध्ये रंगणार सत्तासंघर्षाचा आखाडा; Gen Zसाठी सत्ताधाऱ्यांचा गेमचेंजर प्लॅन?

दरम्यान अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आता मेस्टा शिक्षक संघटनेनेही आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे. महाराष्ट्र इंग्लिश स्कूल टीचर असोसिएशन अर्थात मेस्टा संघटनेच्या वतीने किरण चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या 20 वर्षांपासून विनाअनुदानित शिक्षक आणि इंग्लिश स्कूलमधील शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी काम करत असल्याचं चौधरी यांनी सांगितलं. अनेकदा शासनाकडे प्रश्न मांडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा करत आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com