विधानसभा निवडणुकीपूर्वी उच्च न्यायालयाचा भाजपला दणका; नेत्याची थेट आमदारकी रद्द, काय आहे प्रकरण?

UP Politics: अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०२२ मध्ये निवडून आलेले भाजप आमदार ओम कुमार यांची निवडणूक रद्द केलीय. उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाचा हा निकाल आला आहे.
Bjp Mla Om Kumar's Election Cancelled | Allahabad High Court Verdict
Bjp Mla Om Kumar's Election Cancelled | Allahabad High Court Verdict
Published On: 
Summary
  • भाजप आमदार ओम कुमार यांची निवडणूक रद्द केली

  • आमदार ओम कुमार यांना हायकोर्टाचा धक्का

  • विधानसभा निवडणुकीतील ओम कुमार यांची निवड न्यायालयाकडून अवैध

विधानसभा निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का बसलाय. बिजनौर जिल्ह्यातील नेहतौर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे भाजप आमदार ओम कुमार यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसलाय. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले ओम कुमार यांची निवड उच्च न्यायालयाने अवैध ठरवून ती रद्द केलीय. मात्र, राष्ट्रीय लोक दलाचे (आरएलडी) उमेदवार मुन्शी राम यांनी स्वतःला विजयी घोषित करण्याची केलेली मागणी न्यायालयाने फेटाळून लावलीय. हा आदेश न्यायमूर्ती सलिल कुमार राय यांनी दिलाय.

Bjp Mla Om Kumar's Election Cancelled | Allahabad High Court Verdict
UP Election: महिलांना ४००००ची पेन्शन, बेरोजगारांना ५००० रुपये; सपानं उघडला घोषणांचा पेटारा

२०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत १४ फेब्रुवारी २०२२ रोजी मतदान झाले होते. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ओम कुमार यांना ७७,९३५ मते मिळाली, तर आरएलडीचे उमेदवार मुन्शी राम यांना ७७,६७७ मते मिळाली. ओम कुमार अवघ्या २५८ मतांच्या फरकाने विजयी झाले. त्यानंतर पराभूत उमेदवार मुन्शी राम यांनी 'लोकप्रतिनिधी कायदा, १९५१' (Representation of the People Act, 1951) अंतर्गत निवडणूक याचिका दाखल करून ओम कुमार यांच्या निवडीला आव्हान दिलं होतं.

Bjp Mla Om Kumar's Election Cancelled | Allahabad High Court Verdict
आणखी एका राजकीय भूकंपाची चर्चा! मुख्यमंत्र्यांनी हात काढला तर बंडखोर आमदारांचा गट होणार गायब, भाजप नेत्याच्या विधानानं खळबळ

प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप

ओम कुमार यांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रांसोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात (फॉर्म-२६) महत्त्वाची माहिती लपवून ठेवलीय. अनेक रकाने रिकामे सोडलेत. फॉर्म-२६ च्या परिच्छेद ४ मध्ये, उमेदवाराला मागील पाच आर्थिक वर्षांच्या (२०१७-१८ ते २०२१-२२) प्राप्तिकर विवरणपत्रांत (Income Tax Returns) घोषित केलेल्या एकूण उत्पन्नाचा तपशील देणे आवश्यक होतं. परंतु ओम कुमार यांनी फक्त २०२१-२२ या आर्थिक वर्षातील उत्पन्न (१,४५,८१,०५९ रुपये) चा तपशील दिला होता. तर त्यापूर्वीच्या चार आर्थिक वर्षांचे (२०१७-१८ ते २०२०-२१) रकाने पूर्णपणे रिकामे सोडले होते.

उमेदवाराची आर्थिक पार्श्वभूमी जाणून घेण्याचा मूलभूत अधिकार

'रिसर्जन्स इंडिया' (Resurgence India) आणि 'लोक प्रहरी' (Lok Prahari) प्रकरणांमधील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा संदर्भ देत, न्यायालयाने स्पष्ट केलं की, राज्यघटनेच्या अनुच्छेद १९(१)(अ) अंतर्गत, मतदारांना उमेदवाराची आर्थिक पार्श्वभूमी जाणून घेण्याचा मूलभूत अधिकार आहे. शपथपत्रातील अनिवार्य रकाना कोरा सोडणे ही एक गंभीर चूक मानली जाते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने (रिटर्निंग ऑफिसर) त्रुटीपूर्ण नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे अयोग्य होतं. त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर झालाय.

बचाव पक्षाचा हा युक्तिवादही न्यायालयाने फेटाळून लावत, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीदरम्यान हा अर्ज वैध मानला होता. त्याबाबत कोणतीही नोटीस दिली नव्हती. याचिकाकर्ते मुन्शी राम यांनी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट (VVPAT) स्लिप्स आणि टपाल मतपत्रिकांच्या मोजणीमध्ये अनियमितता असल्याचा आरोप करून फेरमोजणीची मागणी केली होती. मात्र पुराव्याअभावी न्यायालयाने मोजणी प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार झाल्याचे आरोप फेटाळून लावले होते .

आयोगाला आणि विधानसभेच्या अध्यक्षांना सुचना द्या

यासह ओम कुमार यांची निवडणूक रद्द झाल्यानंतर, आपल्याला निवडून आलेले घोषित करावे. कारण आपल्याला दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळाली होती. अशी मुन्शी राम यांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावलीय. न्यायालयाने स्पष्ट केलं की, अनेक उमेदवार रिंगणात असलेल्या निवडणुकीत अपात्र ठरलेला उमेदवार जर रिंगणात नसता, तर त्याला मिळालेली मते दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारालाच मिळाली असती, असे गृहीत धरता येणार नाही.

उच्च न्यायालयाने निबंधक महासंचालकांना (रजिस्ट्रार जनरल) निर्देश दिले की, त्यांनी या निकालाबाबत भारतीय निवडणूक आयोग आणि उत्तर प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांना त्वरित सूचित करावे, तसेच या आदेशाची प्रमाणित प्रत एका आठवड्याच्या आत निवडणूक आयोगाकडे पाठवावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.