

बेरोजगार तरुणांना ५ हजार रुपयांचा भत्ता देण्याची समाजवादी पक्षाची घोषणा
उत्तर प्रदेशात पाच वर्षांत २५ लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन
शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि गावांमध्ये मोफत वीज देण्याची सपाची घोषणा
समाजवादी पक्षाने २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा जाहीर केला. निवडणुकीत सपानं एनडीएच्या तुलनेत आघाडी घेत आपल्या कार्यक्रमांना वेग दिलाय. जागा वाटप असो की पक्षाचा जाहीरनामा जाहीर करणं असो. सपाने आपल्या जाहीरनाम्यातून उत्तर प्रदेशातील नागरिकांना मोठं-मोठं आश्वसानं देत घोषणांचा वर्षाव केलाय.
या जाहीरनाम्यात पाच वर्षांत २५ लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देणं, शेतकऱ्यांची कर्जमाफी, गावांमध्ये मोफत वीज पुरवण्याचे, तसेच २३ पिके आणि दुधासाठी किमान आधारभूत किमतीची (MSP) कायदेशीर हमी देण्याचे आश्वासनही देण्यात आलंय. 'संविधान दिना'च्या निमित्ताने समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हा जाहीरनामा सादर केलाय. 'जन-मन का जाहीरनामा २०२७' (लोकांचा जाहीरनामा २०२७) या संकल्पनेवर आधारित या दस्तऐवजाला 'पीडीए का प्रणपत्र' असे नाव देण्यात आलंय.
जाहीरनाम्यात मागासवर्ग, दलित, अल्पसंख्याकांसह इतर वंचित वर्गाच्या सामाजिक आणि आर्थिक विकास करण्यासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. रोजगार, शिक्षण, आरोग्य, महिला सुरक्षा आणि शेतकरी यांच्याशी संबंधित प्रश्नांवर भर देण्यात आला आहे.
समाजवादी पक्षाने पुढील पाच वर्षांत २५ लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिलंय. यासह इतर क्षेत्रांत २ ते ३ कोटी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी वचन दिलंय. तसेच सरकारी रिक्त पदे भरण्यासाठी एक वार्षिक वेळापत्रक तयार करण्याचे आश्वासनही पक्षाने दिलंय. प्रत्येक पदवीधर बेरोजगारांना ५ हजार रुपयांचा भत्ता देण्याचं आश्वसनही पक्षाकडून देण्यात आलंय.
उत्तर प्रदेशात बंद पडलेल्या २६,००० प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करण्यासह इयत्ता १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लॅपटॉप देऊ. यासह सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये वाय-फाय (Wi-Fi) सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
निवडणूक जाहीरनाम्यात २३ पिके आणि दुधासाठी किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी, शेती कर्जमाफी, आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी २४ तासांच्या आत चुकवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यासह सिंचनासाठी मोफत वीज आणि ग्रामीण भागातील घरगुती वापरासाठी ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा प्रस्तावही यात मांडण्यात आला आहे.
समाजवादी पक्षाच्या जाहीरनाम्यात 'समाजवादी कॅन्टीन' सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आलंय. ज्याद्वारे मागासवर्गीय, दलित आणि अल्पसंख्याक समुदायांतील महिलांना तसेच गरिबांना पाच रुपयांत जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासरह जाहीरनाम्यात वृद्ध महिला कारागिरांसाठी वार्षिक ४०,००० रुपयांचे पेन्शन देण्याचा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी कायदा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.