आणखी एका राजकीय भूकंपाची चर्चा! मुख्यमंत्र्यांनी हात काढला तर बंडखोर आमदारांचा गट होणार गायब, भाजप नेत्याच्या विधानानं खळबळ

West Bengal Politics : पश्चिम बंगालमध्ये ५८ बंडखोर आमदारांच्या गटाबाबत भाजप मंत्री शारद्वत मुखर्जी यांनी केलेल्या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यांच्या विधानामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडालीय.
West Bengal Politics: Bjp Minister's Viral Video On 58 Rebel Mlas Sparks Row
West Bengal Politics: Bjp Minister's Viral Video On 58 Rebel Mlas Sparks Rowsaam tv
Published On: 
Summary
  • आरोग्यमंत्री शारद्वत मुखर्जी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

  • बंडखोर आमदारांची आमदारकी मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्यामुळे टिकलीय.

  • मुख्यमंत्र्यांना २८० आमदारांचे समर्थन असल्याचा मंत्र्यांचा दावा.

पश्चिम बंगाल सरकारमधील आरोग्य मंत्री शारद्वत मुखर्जी यांचा एका व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. बंडखोर आमदारांची आमदारकी धोक्यात असल्याचं विधान केलंय.

ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांवर मुख्यमंत्री शुभेंद्रु अधिकारी यांची कृपा आहे. मुख्यमंत्र्यांच्या कृपादृष्टीने त्यांची आमदारकी टिकून आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा काढून घेतील त्याच दिवशी बंडखोर आमदारांचा ग्रुप नामशेष होईल. यासह मंत्री मुखर्जी यांनी दावा केला की, मुख्यमंत्री शुभेंद्रु अधिकारी यांना २८० आमदारांचं समर्थन आहे.

West Bengal Politics: Bjp Minister's Viral Video On 58 Rebel Mlas Sparks Row
दारूड्यांसाठी सरकारची अनोखी योजना; दारू पिण्याआधी होणार मेडिकल टेस्ट

दरम्यान मंत्री मुखर्जी यांचा हा व्हिडिओ सीपीआय(एम) नेते शतरूप घोष यांनी हा शेअर केलाय. यात मुखर्जी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाला 'मृत टीएमसी' (dead TMC) असे म्हणत आहेत. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारणात वाद निर्माण झालाय. पश्चिम बंगालमध्ये जूनमध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानतंर टीएमसीचे ८० पैकी ५८ आमदारांनी ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वात बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला होता. दरम्यान मुखर्जी यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना बंडखोर आमदारांच्या गटाकडून जोरदार टीका केलीय. ऋतब्रत बॅनर्जीच्या गटातील नेत्यांनी मुखर्जींना गंभीर इशारा दिलाय.

West Bengal Politics: Bjp Minister's Viral Video On 58 Rebel Mlas Sparks Row
Union Cabinet: बंदरे ते एअरपोर्ट, 19,934 कोटींचा खर्च; केंद्राकडून ५ योजनांना मंजुरी, वाचा मोदी सरकारनं घेतलेले ५ मोठे निर्णय

भाजप आणि बंडखोर आमदारांच्या गटाची प्रतिक्रिया काय?

आरोग्य मंत्री मुखर्जींच्या दाव्यावर केंद्रीय राज्यमंत्री सुकांत मजूमदार यांनी प्रतिक्रिया दिलीय. कदाचित सध्या विरोधी पक्ष अस्तित्वात नाहीये, असं त्यांना म्हणायचं असेल. परंतु त्यांच्या विधानाचा अर्थ काय होता, हे खुद्द मंत्री महोदय अधिक योग्य प्रकारे सांगू शकतात. दुसरीकडे बंडखोर गटाचे आमदार अखरुज्जमान म्हणाले की मुखर्जी यांना लवकरच विरोधी पक्ष काय असतो हे कळेल. ममता बॅनर्जीच्या गटाचे नेते कुणाल घोष म्हणाले की, आरोग्य मंत्र्यांनीच विरोधी गटाचा चेहरा सर्वांसमोर आणलाय.

West Bengal Politics: Bjp Minister's Viral Video On 58 Rebel Mlas Sparks Row
आता पुरुषांनाही मिळणार १५ दिवसांची पॅटरनिटी लिव्ह! मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

दरम्यान २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर टीएमसीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर जून महिन्यात २७ लोकसभा खासदारांपैकी २० खासदारांनी वेगळी चूल मांडत एनसीपीआयमध्ये समाविष्ट झाले होते. त्यानंतर त्यांनी एनडीएला पाठिंबा दिला होता. यानंतर विधानसभेतही बंडखोरी झाली. पक्षाच्या सुमारे ८० आमदारांपैकी ५८ आमदारांनी विरोधी पक्षनेते म्हणून रिताब्रत बॅनर्जी यांच्या नियुक्तीला पाठिंबा दिला. बंडखोर आमदारांनी एक स्वतंत्र बैठक घेतली, अरूप रॉय यांची अध्यक्ष म्हणून निवड केली आणि एक समांतर संघटना स्थापन करण्याची घोषणा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.