

तमिळनाडू सरकारकडून पुरुष कर्मचाऱ्यांना १५ दिवसांची पितृत्व रजा
मुख्यमंत्री विजय यांचा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय
बाळाच्या जन्मानंतर वडिलांना १५ दिवसांची सुट्टी मिळणार
सी.जोसेफ विजय यांनी जेव्हापासून तमिळनाडू राज्याची धुरा हाती घेतलीय, तेव्हापासून ते एकापाठोपाठ एक असे धडाकेबाज निर्णय घेत आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. हा निर्णय आहे, पॅटरनिटी लिव्ह (पालकत्वाच्या सुट्टीचा) हो, आता पुरुषांनाही पॅटरनिटी लिव्ह म्हणजेच पितृत्व रजा मिळणार आहे, तेही तब्बल १५ दिवसांची. पितृत्वच्या सु्ट्टीचा निर्णय घेतल्यानं राज्य सरकारमध्ये कार्यरत असलेल्या विवाहित पुरुष कर्मचाऱ्यांना त्यांच्या अपत्याच्या जन्माच्या वेळी १५ दिवसांची रजा घेण्याचा अधिकार असणार आहे.
बाळाच्या आईला शारिरिक आणि मानसीक आधार देण्यासह मुलाची काळजी घेणं ही वडिलांचीही मोठी भागीदारी असते. त्यामुळे तमिळनाडू सरकारनं पुरुष कर्मचाऱ्यांनाही १५ दिवसाची पॅटरनिटी लिव्ह देण्याचा निर्णय पारीत केलाय. जेणेकरून कर्मचारी आपल्या पत्नीच्या मॅटरनिटी लिव्हमध्ये त्यांच्यासोबत राहू शकतील.
तमिळनाडू राज्यात महिला कर्मचाऱ्यांना आता ३६५ दिवसाची मॅटरनिटी लिव्ह दिली जाते. त्यामुळे पुरुष कर्मचाऱ्यांना पॅटरनिटी लिव्ह देण्यात यावी अशी मागणी केली जात होती. या मागणीचा विचार करून सरकारनं १५ दिवसांची पॅटरनिटी लीव्ह देण्याचा निर्णय घेतलाय. बाळाचा जन्म होतो तो काळ आई-वडिलांसाठी खूप महत्त्वाचा असतो. त्याकाळात पत्नीला मानसीक आधार देण्यासह नवजात शिशुची काळजी घेण्यासाठी पिताची भागादारी आवश्यक असते.
पुरुषांना ही १५ दिवसांची सुट्टी बाळंतपणाआधी किंवा प्रसुतीनंतर घेता येणार आहे. म्हणजेच बाळाचा जन्म झाल्यानंतर ६ महिन्याच्या आत सुट्टी घेता येईल. सरकारच्या या सु्ट्टीच्या निर्णयामुळे नागरिकांना कौटुंबिक जबाबदारी वाटून घेण्यास मदत मिळेल आणि बाळाचं पालन-पोषण देखील चांगल्या प्रकारे होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.