Union Cabinet: बंदरे ते एअरपोर्ट, 19,934 कोटींचा खर्च; केंद्राकडून ५ योजनांना मंजुरी, वाचा मोदी सरकारनं घेतलेले ५ मोठे निर्णय

Modi Cabinet Approves : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विमानतळ, बंदर, बांधकाम उपकरण निर्मिती आणि टपाल सेवांशी संबंधित पाच योजनांना एकूण १९,९३४ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली.
Modi Cabinet Approves 5 Projects Worth ₹19,934 Crore: Airport, Port And Manufacturing
Modi Cabinet Approves 5 Projects Worth ₹19,934 Crore: Airport, Port And Manufacturing
Published On: 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच मोठे निर्णय घेतलेत. पायाभूत सुविधा, उत्पादन क्षेत्र आणि टपाल सेवा बळकट करण्यासाठी पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. या योजनांवर सरकार एकूण १९,९३४ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या निर्णयांमध्ये आसाममधील सिल्चर येथे नवीन 'ग्रीनफिल्ड' विमानतळ उभारण्यास मंजुरी आणि तामिळनाडूतील कामराजर बंदरात दुसऱ्या कंटेनर टर्मिनल उभारलं जाणार आहे. यासह स्वदेशी उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी ११००० कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देण्यात आलीय.

Modi Cabinet Approves 5 Projects Worth ₹19,934 Crore: Airport, Port And Manufacturing
रेखा कोंडे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी; पुण्यातील मारहाण प्रकरणानंतर पक्षाचा निर्णय

• बांधकाम उपकरणांच्या उत्पादनासाठी ११,००० कोटी रुपयांची योजना

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कंस्ट्रक्शन अॅण्ड इंफ्रास्ट्राक्चर इक्किपमेंटचे (Construction and Infrastructure Equipment - CIE) उत्पादनाला चालना देण्यासाठी मंत्रिमंडळाने ११,००० कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना आर्थिक वर्ष २०२६-२७ ते २०३३-३४ अशा आठ वर्षांच्या कालावधीसाठी लागू असेल. ही योजना आर्थिक वर्ष २०२६-२७ ते २०३३-३४ अशा आठ वर्षांच्या कालावधीसाठी लागू असणार आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की, भारताचा 'सीआयई' (संपर्क, माहिती आणि इलेक्ट्रॉनिक्स - Communication, Information, and Electronics) उद्योग हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये या क्षेत्राची बाजारपेठ सुमारे ९७,००० कोटी रुपयांची होती. मात्र, या क्षेत्राच्या गरजांपैकी सुमारे ४५ टक्के गरजा आयातीद्वारे पूर्ण केल्या जातात. आधुनिक उपकरणांच्या निर्मितीची क्षमता देशांतर्गत विकसित करणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Modi Cabinet Approves 5 Projects Worth ₹19,934 Crore: Airport, Port And Manufacturing
शेतकरी, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय, जाणून घ्या एका क्लिकवर

कामराजार पोर्टवर बनणार दूसरा कंटेनर टर्मिनल

तमिळनाडूतील कामराजर पोर्ट लिमिटेड (KPL) येथे दुसऱ्या कंटेनर टर्मिनलच्या विकासाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलीय. या प्रकल्पावर सुमारे ४,२८८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हे टर्मिनल 'सार्वजनिक-खाजगी भागीदारी' (PPP) तत्त्वावर, 'डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्सफर' (DBFOT) या आराखड्यानुसार विकसित केले जाईल. १११ एकर जमिनीवर उभारल्या जाणाऱ्या या टर्मिनलची वार्षिक क्षमता २० लाख TEUs (ट्वेंटी-फूट इक्विव्हॅलेंट युनिट्स) इतकी असेल.

या टर्मिनलचा बर्थ (गोदी) ९०० मीटर लांब आणि ३० मीटर रुंद असेल. येथे २४,३४६ टीईयू (TEUs) पर्यंतची क्षमता आणि ४०० मीटरपर्यंत लांबी असलेली मोठी कंटेनर जहाजे हाताळता येतील. या प्रकल्पासाठी सवलतीचा कालावधी (concession period) ४० वर्षांचा निश्चित करण्यात आलाय. यामुळे बंदराची कंटेनर हाताळण्याची क्षमता वाढण्यास आणि सागरी व्यापार अधिक बळकट होण्यास मदत होईल.

सिल्चर येथे नवीन विमानतळ उभारले जाणार

आसाममधील सिल्चर येथील डोलू भागात एक नवीन 'ग्रीनफील्ड' विमानतळ उभारण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलीय. या प्रकल्पासाठी २,०१४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा संपूर्ण खर्च 'एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया' (AAI) आपल्या अंतर्गत संसाधनांतून करणार आहे. या नवीन विमानतळामध्ये गर्दीच्या वेळी दर तासाला ८०० प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असेन. यात ४०० येणारे आणि ४०० जाणारे प्रवासी यांचा समावेश असेल.

टपाल कार्यालयांच्या आधुनिकीकरणासाठी १,१४१ कोटी रुपयांचा खर्च

सरकारने पुढील पाच वर्षांत टपाल कार्यालयांच्या आधुनिकीकरणासाठी १,१४१ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. या निधीचा वापर ग्रामीण भागातील टपाल कार्यालयांमध्ये सुधारणा करण्यासाठी, टपाल आणि पार्सल वितरणाची लॉजिस्टिक प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी आणि सरकारी योजनांचा विस्तार करण्यासाठी केला जाईल. या योजनेअंतर्गत, टपाल विभागाचे जाळे आधुनिक करण्यावर आणि टपाल व पार्सल सेवा अधिक प्रभावी बनवण्यावर भर दिला जाईल. यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागांत राहणाऱ्या लोकांना अधिक चांगल्या सेवा पुरवण्यास मदत होईल.

टपाल विभागाच्या इमारती आणि कर्मचारी निवासस्थानांचे नूतनीकरण

मंत्रिमंडळाने टपाल विभागाच्या 'इस्टेट मॅनेजमेंट स्कीम' (मालमत्ता व्यवस्थापन योजना) सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्षांच्या कालावधीत या योजनेवर १,४९१ कोटी रुपयांचा खर्च केला जाईल. या योजनेत नवीन टपाल कार्यालयांचे बांधकाम, अस्तित्वात असलेल्या टपाल कार्यालयांचे नूतनीकरण आणि सर्व टपाल कार्यालयांमध्ये एकसमान ब्रँडिंग लागू करणे यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.