Maharashtra Politics: अजितदादांच्या पक्षात उलथापालथ होण्याची शक्यता, राज्यातील बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

Vijay Wadettiwar statement on Ajit Pawar NCP : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पक्षात दोन गट पडल्याचेही त्यांनी म्हटले.
Sunetra Pawar
Sunetra PawarSaam TV Marathi
Published On: 

Vijay Wadettiwar, Ajit Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात मोठी उलथापालथ होण्याची दाट शक्यता असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चलबिचल सुरू आहे. त्यातच वडेट्टीवार यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

याआधी सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, "पक्ष एकत्र असावा अशी आमची भूमिका होती. १२ फेब्रुवारी रोजी विलीनीकरण होणार होते," असे विधान केले होते. त्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांच्या या नव्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

"अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता काहीतरी मोठे घडण्याची शक्यता आहे. या पक्षात सध्या दोन उभे गट पडल्याचे समोर येत आहे. भाजपचा स्वभाव हा नेहमीच फूट पाडून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा आणि जुमलेबाजी करण्याचा राहिला आहे. शरद पवार आणि अजितदादांचे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले, तर आम्हाला त्याचा आनंदच होईल," असे वडेट्टीवार म्हणाले.

Sunetra Pawar
Gold Rate: धनत्रयोदशीला सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं ३५०० तर चांदी ९ हजारांनी घसरली; सुवर्णनगरीत गर्दीचा महापूर

शरद पवारांची भूमिका एनडीएला समर्थन देण्याची नाही

पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, "मात्र, शरद पवार यांची भूमिका एनडीएला समर्थन देण्याची कधीच असणार नाही आणि ते तसे करणारही नाहीत. सध्या काहींचे हात दगडाखाली सापडले आहेत. म्हणूनच ते वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करत आहेत. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी राष्ट्रवादीमधील काही नेत्यांची ही धडपड असू शकते. परंतु, शरद पवारांची अशी कोणतीही भूमिका नाही, हे मी विश्वासाने सांगू शकतो."

Sunetra Pawar
Foot Massage: रात्री पायाच्या तळव्याला लावा फक्त एक चमचा तूप; मिळतील आश्चर्यकारक फायदे

अजितदादा असते तर राष्ट्रवादीचे विलिनीकरण झालं असतं - तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत सध्या कोणतीही चर्चा सुरू नसली, तरी जर उपमुख्यमंत्री अजित पवार आज हयात असते, तर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले असते, असा दावा सुनील तटकरे यांनी केला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे ही विलीनीकरणाची चर्चा मागे पडली असून, जर ते असते तर १२ फेब्रुवारी ही तारीख विलीनीकरणासाठी निश्चित झाली असती, असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. सुनील तटकरे यांच्या या वक्त्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.