Gold Rate: धनत्रयोदशीला सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं ३५०० तर चांदी ९ हजारांनी घसरली; सुवर्णनगरीत गर्दीचा महापूर

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर ३,५०० रुपयांनी, तर चांदीचे दर ९,००० रुपयांनी कमी झाल्याने सुवर्णनगरीतील दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
Gold Rate Today
Gold Rate Todaygoogle
Published On: 

संजय महाजन | जळगाव प्रतिनिधी

दिवाळी आणि आज धनत्रयोदशीचा सण असल्यामुळे सोने खरेदीला विशेष महत्त्व असते. या दिवशी सोने खरेदी केल्यास वर्षभर बरकत (समृद्धी) राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. याच पूर्वजांच्या परंपरेनुसार आणि सणाचे औचित्य साधून जळगावमधील सुवर्ण पेढ्यांमध्ये ग्राहकांची फार मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. जळगावच्या बाजारात जीएसटीसह सोन्याचे दर १ लाख ४६ हजार रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत, तर चांदीचे दर प्रति किलो १ लाख ९४ हजार रुपयांवर स्थिर आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर: ₹१,२९,४३०

२४ कॅरेट सोन्याचे दर: ₹१,४१,३००

चांदीचे दर: ₹१,८६,००० (प्रति किलो)

दरांमध्ये मोठी घसरण, ग्राहकांना दिलासा:

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरू आहेत. मात्र, आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात तब्बल ३,५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल ९,००० रुपयांची घसरण झाली आहे. दरांमध्ये झालेली ही घट ग्राहकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरली असून, त्यामुळे ग्राहकांचा सोने-चांदी खरेदी करण्याकडे मोठा कल दिसून येत आहे.

बाजारात काही ग्राहक पारंपरिक दागिन्यांना पसंती देत आहेत, तर काही जण गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्याची नाणी आणि बिस्किटे खरेदी करत आहेत. धनतेरसच्या पार्श्वभूमीवर सराफ बाजारात वाढलेली ही लगबग व्यापाऱ्यांसाठीही अत्यंत उत्साहाची आणि फायदेशीर ठरत आहे.

Gold Rate Today
एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या! पत्नीसह सासरच्यांना संपवून मृतदेह विविध ठिकाणी फेकले; हादरवणारी घटना

मागील वर्षाच्या तुलनेत वाढ कायम:

गेल्या काही दिवसांतील किमतींचा विचार केला तर, मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी सोन्याच्या दरात १५,००० रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल ५०,००० रुपयांची वाढ झालेली आहे. जरी मागील वर्षाच्या तुलनेत दर वाढलेले असले, तरीही धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर नागरिक मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक श्रद्धा जपण्यासाठी जळगावच्या बाजारात खरेदी करताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.