Bengaluru Murder Case, Karnataka Crime News : कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीसह सासरच्या सात जणांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकातील बेंगळुरू येथे घडली आहे. या भीषण हत्याकांडात आरोपीने स्वतःची पत्नी, सासू, दोन मेहुणे, त्यांच्या पत्नी आणि ७ वर्षांच्या चिमुरड्या पुतण्याला संपवले. आरोपीने या सर्वांची हत्या केल्यानंतर मृतदेह बेंगळुरू आणि चिक्कबळ्ळापूर परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले होते. याप्रकरणी पोलिसांनी इंदुशेखर नावाच्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.
बेंगळुरूतील श्रीरामपुरा परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे. दीर्घकाळ चाललेल्या कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृतकांमध्ये आरोपीची पत्नी दिव्या, सासू रूपावती, मेहुणे शिवकुमार व शंकर, त्यांच्या पत्नी आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
माहेरच्या पाठिंब्याचा होता राग:
आरोपी इंदुशेखरचे लग्न होऊन २० वर्षे झाली होती. मात्र, दिव्या माहेरला जाण्यावरून या जोडप्यात वारंवार वाद होत होते. नातेवाईकांनी त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला, मात्र वाद मिटू शकला नाही. पत्नी दिव्याला तिच्या आई आणि भावांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे इंदुशेखरच्या मनात तीव्र राग होता. याच रागातून त्याने सासरच्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे.
हरवल्याची तक्रार अन् पत्नीचीही हत्या:
राजाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरात हे हत्याकांड घडले. आरोपीने सर्वांवर जात्याच्या दगडाने वार करून त्यांची हत्या केली. विशेष म्हणजे, सुरुवातीला घरातील लोक बेपत्ता झाल्याने पत्नी दिव्या हिने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यानंतर आरोपी इंदुशेखरने तिचीही हत्या केली आणि मृतदेह लपवून ठेवले. याप्रकरणी पोलीस सध्या कसून तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.