महाराष्ट्रासाठी खूशखबर! मुंबई-बंगळुरूनंतर आणखी एक स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस धावणार, कोणत्या शहराला होणार फायदा?

New Vande Bharat Sleeper Train News : महाराष्ट्रात नागपूर ते पुणे या मार्गावर स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रस्तावित ट्रेनमध्ये १६ डबे, थ्री-टीअर एसी, टू-टीअर एसी आणि फर्स्ट क्लास एसी सुविधा असण्याचा अंदाज आहे.
Vande Bharat Sleeper Train
New Vande Bharat Sleeper Train NewsSaam Tv
Published On: 

Nagpur to Pune Sleeper Vande Bharat Express: मुंबई ते बंगळुरू या दोन शहरादरम्यान स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली. या स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अशा नागपूर ते पुणे या मार्गावरही स्लीपर वंदे भारत (Sleeper Vande Bharat Express) सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांमधून मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

प्रवाशांचा लांबचा प्रवास आणि गरज

नागपूर हे विदर्भातील प्रमुख शहर आहे, तर पुणे हे शिक्षण, आयटी, उद्योग आणि रोजगाराचे मोठे केंद्र आहे. या दोन्ही शहरांदरम्यान विद्यार्थी,नोकरदार आणि व्यावसायिकांची नेहमीच तुडुंब गर्दी असते. सध्या या मार्गावर चेअरकार प्रकारातील वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. पण या प्रवासाला १२ तास लागतात, त्यामुळे खुर्चीवर बसून प्रवास करणे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांची कुटुंबे आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत असेल. त्यामुळे या मार्गावर स्वतंत्र 'स्लीपर वंदे भारत' सुरू करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

Vande Bharat Sleeper Train
आई-वडिलांमधील तडजोडीमुळे मुलीचा पोटगीचा हक्क संपत नाही; मुंबई कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, वाचा नेमकं काय घडलं?

कशी असेल ट्रेन आणि काय मिळतील सुविधा?

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर ते पुणे मार्गावर प्रस्तावित असलेल्या या स्लीपर ट्रेनमध्ये एकूण १६ डबे असण्याची शक्यता आहे. यामध्ये थ्री-टीआर एसी, टू-टीआर एसी आणि फर्स्ट क्लास एसी अशा तीन श्रेणींचा समावेश असू शकतो. तसेच आधुनिक आसन व्यवस्था, आरामदायक शयनयान सुविधा आणि ताशी १६० किमी पर्यंतचा वेग यामुळे प्रवाशांचा प्रवास अत्यंत जलद आणि सुखकर होण्यास मदत होईल.

Vande Bharat Sleeper Train
ग्रामपंचायतीत प्रशासकीय भूकंप! २ ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित; ग्रामपंचायतीचे दप्तर अद्ययावत न ठेवल्याचा ठपका

कोणत्या जिल्ह्यांना होणार फायदा?

सध्याच्या वंदे भारत ट्रेनचे अजनी, वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड आणि दौंड यांसारख्या स्थानकांवर थांबे आहेत. त्यामुळे प्रस्तावित स्लीपर ट्रेन सुरू झाल्यास विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील प्रवाशांना पुण्याला जाणे अधिक सुलभ होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.