ग्रामपंचायतीत प्रशासकीय भूकंप! २ ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित; ग्रामपंचायतीचे दप्तर अद्ययावत न ठेवल्याचा ठपका

Dadulgaon Gram Panchayat : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील दादुलगाव ग्रामपंचायतीच्या कारभारातील कथित अनियमितता प्रकरणी दोन तत्कालीन ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले आहे.
Gram Panchayat
Gram PanchayatSaam Tv
Published On: 

संजय जाधव, बुलढाणा प्रतिनिधी

Gram Sevak suspension rules : बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील दादुलगाव ग्रामपंचायतीच्या कारभारातील कथित अनियमितता अखेर दोन तत्कालीन ग्रामसेवकांच्या अंगलट आली आहे. ग्रामपंचायतीचे अधिकृत दप्तर व्यवस्थित न ठेवणे, माहिती अधिकारांतर्गत मागणी करूनही आवश्यक माहिती व अभिलेख उपलब्ध करून न देणे, तसेच शासकीय कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अनिल सखाराम अंबडकार आणि विजय शंकर ढगे या दोन तत्कालीन ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले आहे. जळगाव जामोद पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून, या निर्णयामुळे महसूल व पंचायत विभागात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

दादुलगाव ग्रामपंचायतीच्या २०१७ पासूनच्या कामकाजाबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. ग्रामपंचायतीचे अधिकृत अभिलेख अद्ययावत ठेवले जात नसल्याचा, तसेच माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) अर्ज करूनही नागरिकांना आवश्यक कागदपत्रे व माहिती उपलब्ध करून दिली जात नसल्याचा गंभीर आरोप होता. या मनमानी कारभारामुळे ग्रामपंचायतीच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

Gram Panchayat
आई-वडिलांमधील तडजोडीमुळे मुलीचा पोटगीचा हक्क संपत नाही; मुंबई कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, वाचा नेमकं काय घडलं?

८० किलोमीटरचा भव्य मशाल मोर्चा:

या कथित अनियमिततेविरोधात दादुलगाव येथील तरुणांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मानेगाव ते बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तब्बल ८० किलोमीटरचा भव्य पायी मशाल मोर्चा काढण्यात आला होता. ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली होती.

खुलासा समाधानकारक नसल्याने कारवाई:

या प्रकरणाची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत संबंधित ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, संबंधितांकडून प्राप्त झालेला खुलासा असमाधानकारक आणि अयोग्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Gram Panchayat
'रडीचा डाव' खेळणं बंद करा! गोकुळवरून राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; म्हणाले, "आता विरोधकांचा काळ..."

निलंबन काळात कठोर नियम लागू:

निलंबित करण्यात आलेल्या दोन्ही ग्रामसेवकांना निलंबन कालावधीत मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालयाबाहेर जाता येणार नाही. तसेच, या कालावधीत त्यांना कोणतीही खासगी व्यवसाय किंवा इतर नोकरी करण्यासही पूर्णपणे प्रतिबंध घालण्यात आला आहे.

एकंदरीत, दादुलगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात तरुणांनी उभारलेल्या लढाऊ आंदोलनाला यश मिळाले असून प्रशासनाच्या या कठोर कारवाईमुळे भ्रष्ट कारभाराला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, २०१७ पासूनच्या संपूर्ण कामकाजाची सखोल चौकशी करून यात आणखी कोण-कोण सहभागी आहे, याकडे आता संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.