'रडीचा डाव' खेळणं बंद करा! गोकुळवरून राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; म्हणाले, "आता विरोधकांचा काळ..."

Raj Thackeray Statement on BJP: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. विरोधकांचे बहुमत असताना शासकीय संचालक नेमण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत भाजपने 'रडीचा डाव' खेळणे बंद करावे आणि विरोधकांचे यश स्वीकारावे, असा टोला त्यांनी लगावला.
Raj Thackeray
Raj ThackerayAI Image
Published On: 

Raj Thackeray statement on BJP over Gokul milk union controversy : सत्तेत असूनही लोकशाही बचावासाठी मोर्चे काढणाऱ्या भाजपवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टिकेचा बाण मारला आहे. गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या मुद्द्यावरून आणि सत्ता टिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लृप्त्यांवरून राज ठाकरेंनी भाजपच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. बहुमत मिळवता आले नाही म्हणून सत्तेचा गैरवापर करून शासकीय संचालक नेमणे आणि लोकशाहीचा गळा आवळणे चुकीचे आहे. भाजपने आता विरोधकांचे यश सहन करायला शिकले पाहिजे, असा घणाघाती टोला त्यांनी लगावला आहे.

कोल्हापूरच्या बहुचर्चित 'गोकुळ' दूध संघाच्या सत्तेसाठी राजकारण नेहमीच तापलेले असते. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळाला होता. विरोधकांचे बहुमत असतानाही सत्तेत असलेल्या पक्षांनी डावपेच आखत शासकीय संचालक नेमल्याने यावर तीव्र राजकीय पडसाद उमटले आहेत. याच मुद्द्यावरून आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Raj Thackeray
आई-वडिलांमधील तडजोडीमुळे मुलीचा पोटगीचा हक्क संपत नाही; मुंबई कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, वाचा नेमकं काय घडलं?

सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील, असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.

Raj Thackeray
Beed : बोगस खेळाडूंचे रॅकेट उघडकीस आणणाऱ्या वैभवचा मृतदेह आढळला, बीडमधील धक्कादायक घटना

राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी -

भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे १२ विरोधात सतेज पाटील पॅनलचे १३ जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे ( म्हणजे तुमचेच) ५ संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ? बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं !

सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील.

भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे !

राज ठाकरे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.