Foot Massage: रात्री पायाच्या तळव्याला लावा फक्त एक चमचा तूप; मिळतील आश्चर्यकारक फायदे

Namdeo Kumbhar

रात्री झोपण्यापूर्वी पायाला लावा तूप

बॉलीवूड सेलिब्रिटी आपल्या स्किनकेअर आणि आरोग्यासाठी काही खास घरगुती उपाय फॉलो करतात. अशीच एक साधी पण प्रभावी सवय म्हणजे रात्री झोपताना पायाच्या तळव्यांना तूप लावणे. त्याचे अनेक फायदे होतात.

Foot massage ghee Padabhyanga | pinterest

आयुर्वेदातील 'पादाभ्यंग' परंपरा

आयुर्वेदामध्ये पायांच्या तळव्यांची मालिश करण्याला विशेष महत्त्व आहे, ज्याला 'पादाभ्यंग' म्हटले जाते. रोज रात्री नियमितपणे पायांना तूप लावून मालिश केल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.

Foot massage ghee Padabhyanga | pinterest

चेहऱ्यावर येतो चमकदार ग्लो

अनेक प्रकारच्या ब्युटी ट्रिटमेंट्स करूनही जर चेहऱ्यावर हवा तसा ग्लो येत नसेल, तर हा सोपा आयुर्वेद उपाय करून पाहू शकता. पायाच्या तळव्यांचे आणि चेहऱ्याचे खास कनेक्शन असते, ज्यामुळे त्वचा सुधारण्यास मदत होते.

Foot massage ghee Padabhyanga | pinterest

गाढ आणि शांत झोप लागण्यासाठी फायदेशीर

जर तुम्हाला रात्री झोप न येण्याची किंवा निद्रानाशाची समस्या असेल, तर झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यांना थोडेसे तूप चोळून हलकी मालिश करा. यामुळे पायांच्या नसा मोकळ्या होऊन मनाला शांतता मिळते.

Foot massage ghee Padabhyanga | pinterest

टाचांचा कोरडेपणा आणि भेगा होतात दूर

हिवाळ्यात किंवा सततच्या कामामुळे पायांची त्वचा आणि टाचा कोरड्या होऊन फुटतात. तळव्यांना तूप लावल्याने त्वचेवरील ओलावा टिकून राहतो आणि टाचा मऊ होतात.

Foot massage ghee Padabhyanga | pinterest

दिवसभराचा थकवा आणि ताणतणाव होईल दूर

दिवसभर सतत चालणे किंवा उभे राहिल्यामुळे पायांमध्ये तीव्र थकवा जाणवतो. रात्री झोपण्यापूर्वी ३ ते ५ मिनिटे तुपाने मसाज केल्याने संपूर्ण शरीराचा ताणतणाव दूर होतो आणि उत्तम रिलॅक्स वाटते.

Foot massage ghee Padabhyanga | pinterest

शरीरातील रक्ताभिसरण सुधारते

अस्सल देशी तूप पायावर चांगले जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत चोळल्यास शरीराच्या आतरक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारण्यास मदत होते. हा उपाय नियमित केल्यास महिन्याभरात सकारात्मक फरक दिसून येतो.

Foot massage ghee Padabhyanga | pinterest

पित्त आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत

आयुर्वेदामध्ये तूपामध्ये शरीरातील पित्त आणि वात दोष शांत करण्याचे गुणधर्म असल्याचे मानले जाते. रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना तूप लावल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि शरीरातील उष्णता किंवा पित्ताचा त्रास नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते.

Foot massage ghee Padabhyanga | pinterest

तुपाने मसाज करण्याची योग्य पद्धत

सर्वात आधी पाय स्वच्छ धुवून कोरडे करून घ्या. त्यानंतर एक चमचा शुद्ध तूप घेऊन तळवे आणि टाचांवर ३ ते ५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. तूप चादरीला लागू नये म्हणून सुती मोजे (Socks) घालू शकता.

Foot massage ghee Padabhyanga | pinterest

महत्त्वाची खबरदारी

हा एक पारंपरिक घरगुती उपाय आहे. जर तुम्हाला डायबिटीस किंवा त्वचेची कोणतीही गंभीर समस्या असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हा उपाय करावा.

Foot massage ghee Padabhyanga | pinterest