Ajit Pawar Plane Crash: पगार कमी, दारूची सवय अन्...; दादांच्या पायलटला ब्लॅकमेल केलं? रोहित पवारांचा सवाल

Ajit Pawar Plane Crash Row : रोहित पवार यांनी अजित पवार विमान अपघातप्रकरणी आणखी काही खळबळजनक आरोप केले आहेत. विमानाच्या वैमानिकाला ब्लॅकमेलिग करण्यात आले असावे असा आरोप रोहित पवार यांनी केलाय.
Ajit Pawar Plane Crash Row :
Rohit Pawar raises questions about the plane incident at a press conference; new allegations in Deputy Chief Minister Ajit Pawar's plane incidentsaam tv
Published On
Summary
  • अजित पवारांच्या विमान घटनेवरून नवा राजकीय वाद

  • रोहित पवारांनी पायलट ब्लॅकमेल कोनाचा संशय व्यक्त केला

  • कमी दृश्यमानता असूनही विमान उतरवल्याचा आरोप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. बारामतीत दृश्यमानता कमी असतानाही वैमानिक सुमित कपूरने विमान माघारी न फिरवता खाली उतरवलं. त्याने विमानाचा स्फोट करण्यासाठी विमान मुद्दाम खाली आदळले, असा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी केला. पायलटला कोणी तरी ब्लॅकमेल करत होता असा सवालही त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला.

कमी पगार, दारूचं व्यसन आणि डिप्रेशन

अजितदादांचे विमानाचे उड्डाण करण्यासाठी बदलीवर आलेला पायलट सुमित कपूरनं जाणूनबुजून विमान खाली पाडलं असावं. त्यांना कोणीतरी ब्लॅकमेल करत होतं, का याचा तपास केला जावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. अजितदादांचे विमान जाणूनबुजून एका साईटला झुकवण्यात आलं होतं. पायलट सुमित कपूर यांना दारू पिण्याची सवय होती. कपूर हे व्हीएसआर कंपनीमध्ये नोकरीला लागण्यापूर्वी पाच ते सहा वर्ष निलंबित होते. त्यांचा परवाना रद्द करण्यात आला होता. जेट कंपनीत त्यांना १२ लाख रुपये पगार होता. तीन वर्षे त्यांचे लायसन्स बंद रद्द होते.

Ajit Pawar Plane Crash Row :
Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताचा संशय; सुनेत्रा पवारांकडून CBI चौकशीची मागणी

कोविड काळात पाच वर्षे ते पगाराशिवाय होते. दरम्यान इतक्या वर्षाच्या निलंबनानंतर त्यांना पुन्हा लेअर जेटमध्ये नोकरी देण्यात आली. मात्र लेअर जेट कंपनीत आल्यावर त्यांचा पगार साडेतीन लाखांवर आला होता. प्रत्येक फेरीला त्यांना अतिरिक्त २०-२५ हजार रुपये मिळत असाचाये. अशा प्रकारे महिन्याला साधारण ५-६ लाख रुपयांचा पगार त्यांना मिळत होता. दम्यान लेअर जेट कपंनीने सुमित कपूर यांची पार्श्वभूमी तपासली नाही.

Ajit Pawar Plane Crash Row :
Ajit Pawar Plane Crash Case: पायलट कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकले, कधी निघाले? त्याचा CCTV पुरावा द्या; मिटकरींची मागणी

लेअर जेट कंपनी पायलटाचा अनुभव किंवा आधीच्या सवयींकडे दुर्लक्ष करून त्यांना संधी का दिली, असा प्रश्न रोहित पवार यांनी यावेळी केला. सुमित कपूर यांना महागड्या ब्रँडची दारू पिण्याची सवय होती. पगार कमी झाल्यामुळे आणि महागड्या विस्कीच्या ब्रँड्सचा खर्च जास्त होत होता. कपूर यांना काही वैयक्तिक विषयामुळे डिप्रेशन होते. यासर्व गोष्टीचा फायदा घेऊन त्यांच्यावर कोणी दबाव टाकून त्यांना ब्लॅकमेल करत होता का असा सवाल आमदार रोहित पवार यांनी यावेळी केला.

इंधन टाक्या पूर्णपणे भरल्या होत्या

रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक नव्या शंका उपस्थित केल्या आहेत. त्याातील एक शंका म्हणजे, इंधन टाक्या पूर्णपणे भरल्या होत्या. विमानात इतक्या प्रमाणात इंधन का भरण्यात आलं होतं, अशा सवालही त्यांनी केला. अजितदादांच्या विमानाच्या पंखातील इंधनाच्या टाक्या पूर्ण भरण्यात आल्या होत्या. हे विमान बारामतीवरुन हैदराबादला जाणार होते. तिथे विमानात पुन्हा इंधन भरता आले असते.

पण हे विमान सुरतवरुन मुंबईला येत असतानाच त्यात इंधन अधिक भरण्यात आलं होतं. या विमानात अपघाताच्या वेळी ३००० ते ३५०० लीटर इंधन होते. एवढेच नव्हे तर विमानाच्या टॉयलेटजवळ इंधनाचे अतिरिक्त कॅनही ठेवण्यात आले होते. या सगळ्याचा वापर करुन विमानाचा अपघात घडवण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com