Ajit Pawar: अजितदादांच्या अपघाताच्या दिवशीचे CCTV फुटेज देण्यास पोलिसांचा नकार

Ajit Pawar Plane Crash: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास मुंबई पोलिसांनी नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.
Ajit Pawar: अजितदादांच्या अपघाताच्या दिवशीचे CCTV फुटेज देण्यास पोलिसांचा नकार
Ajit Pawar Plane CrashSaam Tv
Published On: 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मुंबईतील देवगिरी शासकीय निवासस्थानापासून मुंबई विमानतळापर्यंतच्या प्रवासाचे तसेच मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी करणारे माहिती अधिकार अर्ज फेटाळण्यात आले आहेत. नागरी विमान सुरक्षा ब्युरो विभागानंतर आता मुंबई पोलिसांनीही सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिल्याचा दावा ॲड. नितीन संजय यादव यांनी केला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत राज्यभरातील नागरिक आणि दादाप्रेमींच्या मनात काही शंका असल्याने त्या दूर करण्यासाठी यादव यांनी माहिती अधिकारांतर्गत २८ जानेवारी २०२६ रोजी मुंबई विमानतळावरील पहाटे ६ ते सकाळी ९ या वेळेतील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती.

मात्र, नागरी विमान वाहतूक विभागाने ही मागणी नाकारली. त्यानंतर त्यांनी प्रथम अपील दाखल केले असता नागरी विमान सुरक्षा ब्युरोनेही फुटेज सर्वसामान्य नागरिकांना देता येणार नसल्याचे सांगत अपील फेटाळले. दरम्यान, अजित पवार यांच्या देवगिरी शासकीय निवासस्थानापासून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज मिळावे, यासाठीही यादव यांनी मुंबई पोलिसांकडे माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला होता. मात्र, ही माहिती सार्वजनिक कामकाजाशी किंवा सार्वजनिक हितसंबंधाशी संबंधित नसल्याचे तसेच ती व्यक्तीच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करणारी असल्याचे कारण देत मुंबई पोलिसांनी फुटेज देण्यास नकार दिला आहे.

Ajit Pawar: अजितदादांच्या अपघाताच्या दिवशीचे CCTV फुटेज देण्यास पोलिसांचा नकार
Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताचं राजकारण करू नका, सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

विशेष म्हणजे, नागरी विमान सुरक्षा ब्युरोने संबंधित सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिल्याचे उत्तरात नमूद केले आहे. त्यामुळे फुटेज अस्तित्वात असून ते तपास यंत्रणांना देण्यात आले आहे, असे स्पष्ट होत असताना सर्वसामान्य नागरिकांसाठी ते सार्वजनिक का केले जात नाहीत?, असा सवाल ॲड. यादव यांनी उपस्थित केला आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि संविधानिक पदावर कार्यरत असलेले लोकप्रतिनिधी होते. त्यामुळे त्यांच्या अपघाताशी संबंधित माहितीला केवळ खासगी माहिती म्हणून नाकारणे योग्य नसल्याचे यादव यांचे म्हणणे आहे.

Ajit Pawar: अजितदादांच्या अपघाताच्या दिवशीचे CCTV फुटेज देण्यास पोलिसांचा नकार
Ajit Pawar Plane Crash: 'माझा भाऊ गेला, 40 आमदार सत्ता भोगतायत'; अजितदादांच्या अपघातप्रकरणी FIRचं काय झालं?

अजितदादांचा घातपात झाला नसेल तर केंद्र आणि राज्य सरकारने त्या दिवसांचे उपलब्ध संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तातडीने सार्वजनिक करावे. त्यामुळे जनतेच्या आणि दादाप्रेमींच्या मनातील शंका दूर होतील, अशी मागणी ॲड. नितीन यादव यांनी केली आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी माहिती अधिकारात दिलेले उत्तर आणि नागरी विमान सुरक्षा ब्युरोने प्रथम अपील फेटाळताना दिलेले उत्तरही त्यांनी उपलब्ध करून दिले आहे.

दरम्यान, अजितदादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. तर अमित शाहांनीही या अपघाताचं सत्य समोर आणण्याचं आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांच्यासमोर जाहीरपणे अजितदादांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला शब्द दिला की, दादाचा अपघात झाला त्याची पारदर्शक चौकशी होऊन महाराष्ट्राला आणि दादाप्रेमींना ही माहिती दिली जाईल. अमित शहा यांनी देखील शब्द दिला. तातडीने अपघाताची माहिती काढून देशाला आणि राज्याला खरी माहिती मिळाली पाहिजे. सत्य बाहेर आलेच पाहिजे. '

Ajit Pawar: अजितदादांच्या अपघाताच्या दिवशीचे CCTV फुटेज देण्यास पोलिसांचा नकार
Ajit Pawar Death Controversy: अजितदादांचा अपघात नव्हे घातपात', दादांच्या राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचाही दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.