
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार आहेत. आज रात्री आठ वाजता त्यांचे संबोधन आहे. भारत-पाकिस्तान तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलतील, याकडं अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री तलुक्यातील पिंपळनेर परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार साक्री तालुक्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला.
आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुपारी ढगाळ वातावरण झाले. त्यानंतर काही वेळाने मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळं नागरिकांची धावपळ उडाली.
नाशिक जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील बागलाणमधील पिंगळवाडे येथे गारपीट झाली. काही ठिकाणी पावसामुळे काढून ठेवलेला कांद्याला मात्र फटका बसला आहे.
भारत-पाकिस्तान या दोन देशांत तणाव वाढला होता. या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली. १२ मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चा होणार होती. त्यानुसार, आज ही चर्चेची फेरी झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर ही चर्चा झाली याची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.
भारत - पाकिस्तान या दोन देशांत वाढलेला तणाव शस्त्रसंधीनंतर निवळला. अमेरिकेच्या मध्यस्थीने ही शस्त्रसंधी झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. तशी घोषणा त्यांनी स्वतः एक्सवर पोस्टद्वारे केली. याबाबत माध्यमांनी विचारलं असता, शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंत आपल्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये तिसऱ्या देशानं हस्तक्षेप केला नव्हता. पण पहिल्यांदाच आपल्या अंतर्गत मुद्द्यावर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बोलले, असे पवार म्हणाले.
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका होत आहे. ही योजना बंद करण्यात येईल, असं विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की ही लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. आम्ही दिलेला शब्द नक्की पाळणार, असं शिंदे म्हणाले. ते बुलडाण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शिक्षण विभागानं महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सीमेपासून दूर असलेल्या जिल्ह्यांमधील शिक्षण संस्था सुरू होणार आहेत. मात्र, सीमावर्ती भागातील जिल्ह्यामधील शाळा बंदच राहणार आहेत. जम्मूच्या विभागीय आयुक्तांनी ही माहिती दिली आहे.
बारामती शहरात आज सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली. अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा मिळाला आहे.
मनमाड शहर व परिसरात दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दीड तास पावसानं झोडपून काढलं. शहरातील काही भागातील रस्त्यांवर पाणी साचलं. उन्हाळ्यात पांझन नदी वाहू लागली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात जोरदार पावसाने हजेरी लावलीये.. शहरात बाजाराचा दिवस असल्याने बाजारपेठेत गर्दी होती मात्र अचानक पाऊस आल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.. अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे..
भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच देशाला संबोधित करणार आहे.
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी,कुंभारी, गारखेडा,लिंगेवाडी, बेलोरा आणि वलसा यासह इतर आसपासच्या गावात अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली.
पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दोघांना दुखापत...
अचानक सुटलेल्या वादळ वाऱ्यामुळे पेट्रोल पंपाचे छत अचानक कोसळले...
या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करण्याची वेळ...
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तांदळे नामक व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाली आहे...
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील सुरू आसलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी हॅकर्स भारतीय नागरिकांना सोशल मीडियाद्वारे लक्ष्य करत सायबर हल्ले होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असुन यासंदर्भातील नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखिल केले जात आहे,
अग्निशामक दलाचे बंब पोलिस घटनास्थळी दाखल.
आगीचा कारण अस्पस्ट
गेल्या 48 तासात सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 800 रूपयांनी घसरण झाली असून सोन्याचे दर 93 हजार 800 रुपयांवर पोहोचले आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात गुटखा विकणाऱ्या दोघांना महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्यात .जीशान खान आणि सोहेल खान अशी या दोघांची नावे आहेत.त्यांच्याजवळून पोलिसांनी सुमारे 18 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे .
जालना जिल्ह्यातील धुळे-सोलापूर महामार्गावर बारसवाडा फाट्याजवळ रविवारी मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या हायवा ट्रकने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात परप्रांतीय दांपत्याचा जागीच मृत्यू झाला असून कार मधील इतर 5 जन जखमी झालेत. मृत्यू झालेल्यांमध्ये जी. रामू (वय ४५) आणि जी. माधुरी (वय ४०) हे दांपत्य असून, दोघेही हैदराबादचे रहिवासी होते. हैदराबादहून शिर्डी येथे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला. यातील सर्व जखमीवर छत्रपती संभाजीनगर मधील खाजगी रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत.अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला होता. मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढावे लागले
कोल्हापूर विमानतळ परिसरातून जाणारा उजळाईवाडी - तामगाव रस्ता कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने रस्ता बंद करण्यात आला आहे. मात्र या रस्त्याला वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता न दिल्याने नागरिकांनी आंदोलन छेडले. विमानतळ विस्तारीकरण झाल्यानंतर या रस्ता बंद करण्यात आला आहे. मात्र आम्हाला आता तात्काळ दुसरा रस्ता उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी या गावकऱ्यांनी केलीये...ज्या ठिकाणी हा रस्ता बंद करण्यात आला आहे तिथे नागरिकांनी एकत्र येत आंदोलन केले. शिवाय प्रशासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
यंदा तीळ उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. जिल्ह्यात साधारणतः तीन हजार हेक्टर जमिनीवर तीळाचा पेरा असून तीस हजार क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना तीळ विक्रीची वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपला तीळ शेतमाल बाजार समितीचे मुख्य धान्य मार्केटला विक्रीसाठी आणावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
पुण्याच्या इंदापूर मध्ये मध्यरात्री अवकाळी पाऊस झालाय. या पावसामुळे इंदापूर शहराच्या बाह्यवळणावर महात्मा फुले चौकात पुणे सोलापूर महामार्गावर पावसाच्या पाण्याची डबकी साचली आहेत. या पाण्याच्या डबक्यातून वाहन चालकांना मार्ग काढीत प्रवास करावा लागतोय.
नाशिक पंचवटी कारंजा येथे माधवजिका चिवडा दुकानाच्या वर वाड्याला भीषण आग
अग्निशामक दलाचे बंब पोलिस घटनास्थळी दाखल.
आगीचा कारण अस्पस्ट
मुरबाड तालुक्यातील अंगणवाडी भरती प्रक्रियेतील गैरव्यवहारप्रकरणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता योगिता शिर्के यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडे केलीय. या प्रकरणी शिर्के यांनी मुरबाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांची भेट घेऊन कारवाई बाबत विचारणा केली असता त्यांनी बोलणं टाळलं.
मागील काही दिवस भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे राज्यातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी हाय अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे भाविकांची संख्या रोडावली होती. दरम्यान दोन्ही देशांमध्ये युध्दजन्य परिस्थिती आता निवळू लागली आहे. त्यामुळे पुन्हा पंढरपूर सह अनेक तीर्थस्थळी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे पंढरपुरात ही आज विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. आज सकाळपासूनच भाविकांची विठ्ठल दर्शनासाठी रांग लागली आहे. भाविकांची संख्या वाढल्याने विठ्ठल दर्शनासाठी सुमारे चार ते पाच तासांचा अवधी लागत आहे. भारत पाकिस्तानमधील तणाव कमी झाल्याचा परिणाम पंढरपुरात दिसू लागला आहे.
० माणगाव ते इंदापूर दरम्यान वाहनांच्या रांगा
० मुंबईतून कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ
० माणगाव बाजारपेठेत वाहतूक कोंडी
० ताम्हाणी घाटमार्गे पुण्याहून कोकणात येणारी वाहने माणगावमध्ये अडकली
० वाहतूक कोंडी फोडताना पोलिसांची दमछाक
खरीप हंगामा संदर्भात आज छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानाची माहिती, खताचा पुरवठा व बी - बियाणांच्या उपलब्धता, इत्यादी विषयचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत पालकमंत्री संजय शिरसाट, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार संदीपान भुमरे, अतुल सावे, अब्दुल सत्तार सह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून ही आढावा बैठक गाजण्याची शक्यता आहे...
राज्यात आर टी अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते त्यामुळे आर्थिक दृष्ट्यामागास कुटुंबातील मुलांना जिल्ह्यातील नामांकित शाळेत मोफत प्रवेश देण्यात येतो.,मात्र लातूर जिल्ह्यात RTE प्रवेशात मनासारखी शाळा न मिळाल्याने अद्यापही 261 जागा रिक्तच आहेत..RTE प्रवेशाकरिता लातूर जिल्ह्यात एकूण 2 हजार 120 एवढ्या जागा आहेत, तर 3 हजार,57 विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता मेसेज पाठवण्यात आले होते ,त्यापैकी चौथ्या फेरीपर्यंत 1हजार 859 विद्यार्थ्यांचे प्रवेश हे निश्चित झाले आहेत... तर उर्वरित प्रवेशाकरिता 14 मे पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे....
लातूरच्या उदगीर आणि रेणापूर तालुक्यातील खरीप 2024 हंगामातील नुकसान भरपाई संदर्भात पीकमा कंपनीकडे तक्रार करूनही ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई रक्कम मिळाली नाही.. अशा शेतकऱ्यांनी लातूरच्या उदगीर येथे 13 मे तर रेणापूर या ठिकाणी 14 मे पर्यंत लेखी स्वरूपात तक्रार कर्ज देण्याचे आव्हान कृषी विभागाने केले आहे.. दरम्यान लेखी तक्रार अर्ज सोबत शेतकऱ्यांनी सातबारा विमा भरलेली पोचपावती जोडणे बंधनकारक असल्याच देखील सांगण्यात आले आहे..
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला आणि दूधाला हमीभाव द्यावा अन्यथा मुंबईला जाणारा भाजीपाला आणि दूध बंद करावा लागेल, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
पंढरपुरात छावा क्रांतीवीर सेनेचे राष्ट्रीय महाधिवेशन अधिवेशन पार पडले. यावेळी शेतकर्यांच्या प्रश्नावर बोलताना तुपकर यांनी राज्य सरकारला हा थेट इशारा दिला आहे. यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर उपस्थित होते.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील १८०० मी. मी व्यासाची अशुद्ध पाण्याची वाहिनी तुटली आहे. सदर जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असून काम पूर्ण होण्यास १२ ते १५ तास लागणार असल्याचे एमआयडीसीने कळवले आहे.
या दुरुस्तीच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समिती येथील पाणीपुरवठा १२ ते १५ तासासाठी पूर्णपणे बंद राहील. काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल. तरी कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.
जळगाव जामोद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधील राधेय कोल्ड्रिंक्स या प्रतिष्ठानला आज पहाटे चार ते साडेचार च्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली या आगीमुळे प्रतिष्ठानचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. तर इतर प्रतिष्ठानलाही हानी पोहोचली आहे.
पोलीस स्टेशनला लागूनच असलेल्या प्रतिष्ठान मध्ये आग लागल्यामुळे पोलीस स्टेशनचे ड्युटीवरी सर्व पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी धावत आले तात्काळ जळगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला प्रचारण करण्यात आले..यावेळी जळगाव जामोद पोलिसांनी मलकापूर व शेगाव येथील अग्निशामक दलाला या ठिकाणी बोलावले होते तिन्ही गाड्यांनी मिळून या आगीवर नियंत्रण मिळविले.
- आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्धेत विविध कार्यक्रम
- देवाभाऊ राष्ट्रीय कब्बडी स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमावर पावसाचे सावट
- कबड्डीचा समारोपीय कार्यक्रम वर्धेच्या सर्कस मैदानात
- खुल्या मैदानात कार्यक्रम असल्याने आयोजकांमध्ये धाकधूक
- वर्धेत रात्री काही ठिकाणी बरसल्या पावसाच्या सरी
- सकाळपासुन जिल्ह्यात ढगाळ वातावरण
भोपाळ येथील एम्स रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या बीड येथील एका तरुणाने पुण्यातील वानवडी परिसरात स्वतःचा गळा चूर्ण आत्महत्या केली . उत्कर्ष महादेव हिंगणे (वय 18) असे त्याचे नाव आहे. त्याने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याची प्राथामिक माहिती आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हाट्सअपवरती सुसाईड नोट लिहली असून, त्यामध्ये आपण आत्महत्या का करत आहे याचे कारण सांगितले आहे. मुलाचे वडील देखील डॉक्टर आहेत.
पंचरत्न हाऊसिंग सोसायटी फातिमा नगर वानवडी येथे एक मुलगा गळा कापलेल्या अवस्थेत बाथरूममध्ये आढळून आला आहे. त्याने व्हाट्सअपवर आत्महत्या करत असल्याचे पोस्ट टाकली आहे. सोमवारी सकाळी सव्वाहा वाजताच्या सुमारास नियंत्रण कक्षाला याबाबतचा कॉल होता. त्यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी हा प्रकार समोर आला.
हिंदू शेरनी हनुमान चालीसां पढने वाली थोडे दिन की मेहमान.. जल्दी उडाने है वाले है. अशा पद्धतीच्या नवनीत राणा यांना धमक्या..
पाकिस्तानातील वेगवेगळ्या फोनवरून धमक्या येत असल्याची माहिती..
रानांकडून पोलिसांना माहिती पोलिसांकडून तपास सुरू...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
चिखली तालुक्यातील इसरूळ या गावी गीता परिवार संस्थेच्या वतीने आयोजित स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यास ते हजेरी लावतील दुपारी तीन वाजता हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
दुपारी तीन वाजता एकनाथ शिंदे या कार्यक्रम स्थळी पोहोचणार आहेत.
आगीत पाच मोठे कंपनी व मंडप डेकोरेशन गोदामाला भीषण आग
या आगीत या कंपन्यांचे 22 गोदाम जळून खाक
1) केके इंडिया पेट्रोलियम स्पेसियालिटीज प्रा . लि.
2) कॅनन इंडिया प्रा . लि. कंपनी ,
3) ब्राईट लाईफकेअर प्रा . लि. कंपनी ,
4) होलीसोल प्रा . लि. कंपनी ,
5) एबॉट हेल्थकेअर प्रा . लि. कंपनी,
6) डेकोरेशन साहित्याचे मोठे गोदाम ,
या गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकल, प्रिंटिंग मशीन इलेक्ट्रॉनिक सामान, आरोग्य संबंधित प्रोटीन खाद्यपदार्थ पावडर , कॉस्मेटिक साहित्य, कपडे, बूट, मंडप डेकोरेशन साहित्य व फर्निचर साठवण्यात आले होते
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या भिवंडी कल्याण येथील चार गाड्या दाखल
शेगाव शहरातील एका पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरत असताना अचानक दुचाकीला आग लागली. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांने समय सुचकता दाखवत तात्काळ ही आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. शेगाव शहरातील मुख्य रस्त्यावर आज सकाळी ही घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे...
धाराशिव तालुक्यातील शिंगोली येथे भारत पाकिस्तान हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना बंजारा समाजाच्या वतीने श्रध्दांजली अर्पन करण्यात आली.अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे.. व भारत माता की जय अशा घोषणा यावेळी उपस्थितांनी दिल्या यावेळी गावातील बंजारा समाजातील जेष्ठ नागरिक व युवक देखील उपस्थित होते.
- मुख्यमंत्री यांच्या हस्ते भाजपच्या नवीन जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन यासह विविध कार्यक्रमांना उपस्थिती
- सेवा पंधरवाडा समारोप, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय लोकार्पण सह देवाभाऊ राष्ट्रीय कब्बड्डी स्पर्धेच्या समरोपाला लावणार मुख्यमंत्री हजेरी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पालकमंत्री पंकज भोयर, खासदार प्रफुल्ल पटेल राहणार उपस्थित
- दुपारी चार वाजता मुख्यमंत्री वर्धेत होणार दाखल, सात वाजेपर्यंत वर्धा शहरात विविध कार्यक्रमात राहणार उपस्थित
- सुदैवानं कोणतीही जीवित हानी नाही
- बार्शी आगारातील एसटी बसचा चालका बाजूचा दरवाजा अचानक उघडल्याने बस घसरली
- दरवाजा उघडल्यानंतर ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात घडला अपघात
- सदर घटनेबाबत वैराग पोलिसात रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल नाही
अमरावती आणि बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद..
वडगाव माहुरे या ठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू आहे..
पाईपलाईन दुरुस्तीसाठी अमरावती शहराला दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार..
पाणी जपून वापरण्याचे आवाहन
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ही माहिती देण्यात आली आहे..
मातंग समाजाला अ ब क ड वर्गीकरणानुसार आरक्षण मिळावं या मागणीसाठी मातंग समाजाकडून 20 मे रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुर येथे मातंग समाजाची जन आक्रोश महामोर्चा राज्यस्तरीय बैठक पार पडलीय. तसेच तुळजाभवानीला मातंग समाजाच्या वतीने महाआरती करून मातंग समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची शक्ती,ताकद महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तुळजाभवानीने द्यावी असे साकडे समाजाच्या वतीने घालण्यात आले.
भाजपामधून निलंबित करण्यात आलेले सांगलीचे माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या उपस्थितीत मिरजेत हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला.आगामी सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार पक्ष बांधणी करण्यात येत आहे, त्यापार्श्वभूमीवर अनेक आजी-माजी नगरसेवक जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करतील,असा विश्वास जनसूराज्य स्वराज्याची पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी व्यक्त केला आहे.तर भाजपाचे माजी उपमहापौर राहिलेले आनंदा देवमाने यांच्या पक्षा प्रवेशामुळे मिरज शहरात जन सुराज्य शक्ती पक्षाची ताकद आणखी वाढणार आहे.
देशभर असलेल्या तेली समाजाला एका छता खाली आणण्यासाठी श्री संताजी नवयुवक मंडळ कडून तेली समाजाने राज्यस्तरीय पहिल अधिवेशन आयोजित केल होत संत नगरी शेगाव मध्ये हे अधिवेशन पार पडलं आहे त्यावेळी भाजप आमदार सह अनेक माजी आमदारासह तेली समाजाचे प्रतिष्ठित म्हणून प्रमुख उपस्थित होते त्यावेळी नेहमीच आपल्या तेली समाजाचा राजकारणात उपयोग झाला आहे मात्र आपण अजूनही राजकीय मुख्य प्रवाहात आलो नाही त्यामुळे आता तेली समाजाने एकत्र येऊन आपण कश्या प्रकारे राजकीय दृष्ट्या सक्षम होऊ यासाठी प्रयत्न करत आगामी निवडणूक मध्ये सहभाग नोंदवीत राज्य कर्ते व्हा अस आव्हान भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केले आहे ..
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला.
शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे.
सोमवारी वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्यावेळी गणेश जन्माची पूजा व अभिषेक झाला.
तसेच मंदिरामध्ये गणेशयाग देखील झाला. गाभाऱ्यासह सभामंडपात शहाळ्यांची व वृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती.
वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता. भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे.
उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो. वैशाख वणव्यापासून देशवासियांचे रक्षण व्हावे.
दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सद्भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी अर्पण करण्यात येतो.
तसेच, दुस-या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे, असेही ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड,जऊळका रेल्वे,वनोजा सह अनेक ठिकाणी रात्री वादळी वाऱ्या सह अवकाळी पाऊस पडला आहे.
जिल्ह्यातील ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस पडत असल्यामुळं वाढलेल्या तापमानाचा पारा कमी झाला आहे. काही ठिकाणी भुईमूग, भाजीपाल्याच नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धाराशिव जिल्ह्याच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
अद्याप उस्मानाबाद नावाने ओळखले जाणारे स्थानिक रेल्वे स्थानक आता अधिकृतपणे "धाराशिव"या नव्या नावाने ओळखले जाणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने 16 एप्रिल रोजी नाहरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने 25 एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली.
यानंतर आता येत्या आठवड्यात नव्या नावाचा बोर्ड लावण्यात येणार आहे. तर धाराशिव–तुळजापूर–सोलापूर हा नवीन रेल्वेमार्ग सध्या बांधणीच्या टप्प्यात असून, मार्च 2027 पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे.
या मार्गामुळे हजारो भाविक,प्रवासी व व्यापाऱ्यांना प्रवासाची नवी सोय उपलब्ध होणार आहे.
सध्या जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस, न्यायालय आदी सर्व विभागांनी आधीच "धाराशिव" हे नाव स्वीकारले आहे.
आता रेल्वे विभागातही हे नाव अधिकृतपणे लागू होणार असल्याने संपूर्ण जिल्हा एकसंध ओळखेसह पुढे येणार आहे.
छावा क्रांती वीर सेनेचे 11 वे राष्ट्रीय महाधिवेशन पंढरपुरात पार पडले.
मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर सोडवावा आणि शेतकर्यांना कर्ज माफी जाहीर करावी अशी मागणी अधिवेशनामध्ये करण्यात आली.
शेतकरी, कामगार आणि मराठा आरक्षण या विषयी छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांच्या उपस्थितीमध्ये हे अधिवेशन येथील छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात झाले. अधिवेशनाला राज्य भरातून पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडावा आणि शेतकर्यांना कर्ज माफी जाहीर करावी अन्यथा छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने राज्यभरात सरकार विरोधात आंदोलन केले जाईल असा इशारा अधिवेशनातून देण्यात आला आहे.
शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीला मांजरीचं नखं लागल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना उल्हासनगरच्या इमली पाडा याठिकाणी घडली आहे. मारहाणीत राकेश रोंदिया आणि पूजा रोंदिया हे जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी युवा सेनेने आता कंबर कसली आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 16 तारखेला नवी मुंबई युवा सेनेचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी युवा सेनेने मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे
तीव्र उन्हामुळे पाणी पातळी खलावली आहे.ग्रामीण भागातील पाण्याचे स्रोत पूर्णत: आटले आहे.
अशा परिस्थितीत टंचाई कृती आराखड्यातून टँकर खाजगी विहीर अधिग्रहणाच्या माध्यमातून नागरिकांना पाणी पुरवठा केल्या जात आहे.
सध्या यवतमाळ जिल्ह्यातील 43 हजारांवर नागरिक पाण्यासाठी व्याकुळ झाले आहे. यावर उपाययोजना म्हणून पाणीपुरवठा विभागाने 24 टँकर चालू केले आहे.
टँकर एकूण 32 फेऱ्या मारत आहे. अनेक भागात वेळेवर पाण्याचा टँकर पोहोचत नसल्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
एका मुस्लिम जोडप्याने विहिरीत विषारी औषध टाकल्याच्या संशयातून रायगड जिल्ह्यातील मुरुडमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.
या प्रकरणी एका जोडप्याला ग्रामस्थांनी पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले.
यावेळी रेवदंडा पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी आणि तालुक्यात तणाव निर्माण झाला होता.
पोलीसांनी या जोडप्याची कसून चौकशी केली असता अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याचे समोर आले.
मुलीचे प्रेमप्रकरण होते, त्यातून तिची सुटका करण्यासाठी एका मांत्रिकाने वीटेला दोरा बांधून 21 विहीरींमध्ये टाकण्याचा सल्ला दिला होता आणि त्याप्रमाणे सदर जोडप्याने हे कृत्य केल्याचे समोर आले.
ताडगाव ते साळाव भागातील चार विहीरींमध्ये दोरा बांधलेली विट टाकली विष टाकले नाही अशी कबुली या जोडप्याने दिली. त्यानंतर तणाव निवळला आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
हिंगोली जिल्ह्यात महिला गुन्हेगारांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे गेल्या पंधरा दिवसात तीन महिलांनी बसस्थानक परिसरासह ज्वेलर्स मधील सोने चांदीच्या दुकानातून दागिने पळवल्याच्या घटना घडल्या आहेत यामध्ये हिंगोलीच्या बसस्थानकामधील एका महिला चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे तर वारंगा परिसरात सोन्या-चांदीच्या ज्वेलर्स मध्ये सोने खरेदीसाठी आलेल्या दोन महिलांनी दागिन्यांची बॅग पळवली आहे या बॅगमध्ये तब्बल सात लाख रुपयांचा सोने चांदीचा ऐवज असल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे दरम्यान या दोन्ही चोरट्या महिलांचा पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेत आहेत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.