Ahmednagar History: अहमदनगरच्या नामांतरला हिरवा कंदील, रेल्वेची 'अहिल्यानगरला' मंजुरी; वाचा संपूर्ण इतिहास

Ahmednagar To Ahilyanagar Name Changed Story: अहमदनगर हा पश्चिम महाराष्ट्रातील हे महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या नामांतराला शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. अहमद निजामशहाने वसवलेले अहमदनगर हे शहर निजामशाहीची राजधानी म्हणूनही ओळखले गेले.
Ahmednagar History: अहमदनगरच्या नामांतरला हिरवा कंदील, रेल्वेची 'अहिल्यानगरला' मंजुरी; वाचा संपूर्ण इतिहास
Ahmednagar To Ahilyanagar Name Changed Story: Saamtv
Published On

Ahmednagar History Special Story: औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण झाल्यानंतर आता अहमदनगरचे अहिल्यानगर नामांतरण होणार आहे. अहमदनगर महानगरपालिकेनंतर रेल्वेकडूनही अहमदनगरच्या नामांतराला हिरवा कंदील देण्यात आला आहे. रेल्वेने अहमदनगरचे अहिल्यानगर करण्यास दिली मंजूरी दिली असून याबाबतचे निवेदनही दिले आहे. महाराष्ट्रातील मोठा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगरला मोठा इतिहास आहे. जाणून घेऊया अहमदनगर ते अहिल्यानगरच्या नामांतराची संपूर्ण स्टोरी....

Ahmednagar History: अहमदनगरच्या नामांतरला हिरवा कंदील, रेल्वेची 'अहिल्यानगरला' मंजुरी; वाचा संपूर्ण इतिहास
Pune News: कुत्र्याला निर्दयीपणे मारलं, पिता-पुत्रांना पोलिसांनी दाखवला इंगा; पुण्यात नेमकं काय घडलं?

अहमदनगरचा इतिहास!

अहमदनगर हा पश्चिम महाराष्ट्रातील हे महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या नामांतराला शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. अहमद निजामशहाने वसवलेले अहमदनगर हे शहर निजामशाहीची राजधानी म्हणूनही ओळखले गेले. या शहराचा दरारा इतका होता की त्याची तुलना थेट कैरो, बगदाद या श्रीमंत शहरांशी केली जायची. आता याच अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले जाणार आहे.

असे पडले नाव...

इ.स. १४८६ मध्ये मलिक अहमद हा निजामशाह बहामनी राज्याच्या ‘पंतप्रधानपदी बसला. पंधराव्या शतकाच्या शेवटी म्हणजे इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजाम शहाने इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले.

Ahmednagar History: अहमदनगरच्या नामांतरला हिरवा कंदील, रेल्वेची 'अहिल्यानगरला' मंजुरी; वाचा संपूर्ण इतिहास
Maharashtra Politics : छत्रपती शिवाजी महाराजांनी दोनदा सुरत कशी लुटली? ठाकरे गटाने थेट इतिहासच सांगितला

विभाजन अन् नामांतराचा मुद्दा गाजला!

याआधी अहमदनगरच्या नामांतरासोबत विभाजनाचाही मुद्दा चांगलाच गाजला होता. शिवसेनेची राज्यामध्ये सत्ता आल्यानंतर ज्या शहरांच्या नामांतराची मागणी झाली त्यामध्ये औरंगाबाद, उस्मानाबाद आणि अहमदनगरचा समावेश होता.सर्वात पहिल्यांदा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि अहमदनगरचे अंबिकानगर करण्याची घोषणा केली होती.

अंबिकानगर ते अहिल्यानगर...

तसेच अंबिकानगरपाठोपाठ सावित्रीबाई फुले यांचेही नाव या जिल्ह्याला देण्यात यावे अशीगी मागणी होत होती. महिला शिक्षणाची मेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी याच जिल्ह्यामध्ये अध्यापनाचे धडे गिरवले, त्यामुळे त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी होत होती. दुसरीकडे अहमदनगर हेच नाव कायम राहावे, यासाठीही काही संघटना पुढे आल्या होत्या. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावी अशी मागणी पुढे आली.

Ahmednagar History: अहमदनगरच्या नामांतरला हिरवा कंदील, रेल्वेची 'अहिल्यानगरला' मंजुरी; वाचा संपूर्ण इतिहास
Chhattisgarh Crime: एकाच घरात चार मृतदेह, काँग्रेस नेत्याने संपूर्ण कुटुंबासह संपवलं आयुष्य; धक्कादायक कारण समोर

दुसरीकडे या जिल्ह्याला छत्रपती शहाजीराजेंचे नाव देण्यात यावे, अशीही मागणी पुढे आली होती. या मागणीसाठी मराठा सेवा संघाने १९८८ साली अधिवेशन घेतले होते. छत्रपती शहाजीराजे भोसले यांनी निजामशाहीमध्ये केलेल्या कर्तृत्वाचा आणि त्यांनी रोवलेल्या स्वराज्याच्या मुहूर्तमेढीचा विचार करुन अहमदनगरला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी घोषणा केली होती, मात्र कालांतराने ही मागणीही मागे पडली.

अहिल्यानगरवर शिक्कामोर्तब!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा जन्म नगर जिल्ह्यातीलच चौंडी तालुका. जामखेड या गावी झाला. अहिल्यादेवी होळकर यांचे वडील माणकोजी पाटील हे चौंडीचे पाटील होते. शिवभक्त असलेल्या अहिल्यादेवींचे संपूर्ण बालपण याच गावामध्ये केले. पुढे अहिल्यादेवी यांचा इंदोर संस्थानाचे खंडेराव होळकर यांच्याशी विवाह होऊ त्या मल्हारराव होळकर यांच्या सून झाल्या. मल्हाररावानंतर अहिल्यादेवी यांनी जवळपास २८ वर्ष माळवा राज्याच्या महाराणी म्हणून राज्य चालवले. या काळात त्यांनी देशभरात धर्मशाळा, मंदिरे, विहिरी, बारवं, अनेक अन्नछत्रे उघडली. त्यांच्या याच महान कर्तृत्वाचा विचार करत महाराष्ट्र सरकारने त्यांचे नाव या जिल्ह्याला देण्याची घोषणा केली.

Ahmednagar History: अहमदनगरच्या नामांतरला हिरवा कंदील, रेल्वेची 'अहिल्यानगरला' मंजुरी; वाचा संपूर्ण इतिहास
Helicopter Crash: इमर्जन्सी लँडिगवेळी मोठी दुर्घटना! बचावासाठी गेलेले हेलिकॉप्टर अरबी समुद्रात कोसळले; ३ जण बेपत्ता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com