Sanjay raut : मुंबईमध्ये लाडक्या उद्योगपतींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली. मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापलेय. विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकेचा बाण सोडलाय. तर सत्ताधाऱ्यांकडूनही याला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. आज संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मुंबईमध्ये लाडक्या उद्योगपतीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा दावा केला आहे.
मुंबई विमानतळ अदानी यांच्या म्हणजे भाजपच्या ताब्यात गेले आहेत. त्यामुळे तिथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागा नाही, जिरे टोप तुटलेला आहे. यावर भाजपचे तथाकथित बोगस शिवभक्त, स्वतःला हिंदूचे कैवारी म्हणणारे, मिंदे गटाचे काय म्हणणे आहे? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय.
मुंबईत आशा प्रकारे शिव पुतळे विटंबना भाजपच्या लाडक्या उद्योगपतीकडून होत असेल तर गंभीर आणि चिंतेची बाब आहे. छत्रपती आमचे दैवत आहे. भाजपचे मिंद्ये गटाचे नाही, कारण शिवाजी महाराजांनी जो स्वाभिमान शिकवला तो यांच्याकडे नाही. त्यामुळे लाडक्या उद्योगपतीकडून उघड्या डोळ्याने अपमान पाहत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.
आमचे शिवसैनिक तिथे पुतळा सोडविण्यासाठी गेले होते. पण अदानीने २०० बाऊन्सर तैनात केले. ते आमच्या सैनिकांवर चाल करुन आले. यांची लोक हिंदुत्वाच्या नावाने भाषण देत आहेत, लाज वाटायली हवी. आजच्या सरकारला शिवाजी महाराजांचे प्रेम नाही, कदाचित कार्यालयातून शिवाजी महाराजांचा फोटो काढून अदानीचा लावतील, असा टोलाही लगवला.संजय राऊत
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.