Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! सलग ६ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याची निवडणुकीतून माघार

Maharashtra Assembly Election 2024: माढा विधानसभेचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी आगामी निवडणुकीतून माघार घेतली आहे. तसेच त्यांनी आपले पुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत शिंदे यांना उमेदवारी देण्याचे जाहीर केले आहे.
Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! सलग ६ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याची निवडणुकीतून माघार
Maharashtra Assembly Election 2024: Saamtv
Published On

माढा, ता. ३० ऑगस्ट २०२४

राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. विधानसभेच्या तयारीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सलग सहा वेळा निवडून आलेले माढा विधानसभेचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी आगामी निवडणुकीतून माघार घेतली आहे. तसेच त्यांनी आपले पुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत शिंदे यांना उमेदवारी देण्याचे जाहीर केले आहे.

Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! सलग ६ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याची निवडणुकीतून माघार
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी शरद पवारांची ताकद वाढली, भाजपला मोठा धक्का; बडा नेता लवकरच तुतारी फुंकणार

आमदार बबन शिदेंची निवडणुकीतून माघार!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सलग सहा वेळा माढा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. बबन शिंदे यांनी आपले पुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी देण्याचे जाहीर केले आहे. पंढरपूर तालुक्यातील एका कार्यक्रमांमध्ये बोलताना आमदार शिंदे यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

मुलाची उमेदवारी जाहीर!

माढा विधानसभा मतदारसंघातून आमदार बबनराव शिंदे हे १९९५ पासून सलग सहा वेळा निवडून आले आहेत. आता या मतदार संघातून त्यांचे पुत्र रणजीत शिंदे विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार शिंदे यांनी राजकीय सन्यास घेण्याचा निर्णय घेतला असून पंढरपूर तालुक्यातील एका कार्यक्रमात पहिल्यांदाच उघडपणे आपल्या पुत्रासाठी मत मागायला सुरुवात केलेली आहे.

Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! सलग ६ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याची निवडणुकीतून माघार
Mumbai News: PM मोदींच्या दौऱ्याआधी मोठ्या घडामोडी! काँग्रेसचं आंदोलन, खासदार वर्षा गायकवाड स्थानबद्ध; मुंबईत वातावरण तापलं!

अभिजीत पाटील देणार आव्हान!

मात्र पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरणाऱ्या रणजीत शिंदे यांच्यासाठी विधानसभेची निवडणूक सोपी असणार नाही.रणजीत शिंदे यांच्या विरोधात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पाटील विरुद्ध शिंदे अशी सरळ लढत होणार आहे. त्याआधी रणजित शिंदे अजित पवार गटातून लढणार की तुतारी हाती घेणार याची उत्सुकता लागली आहे.

Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! सलग ६ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याची निवडणुकीतून माघार
Maharashtra Politics : शिंदे गटाचा बडा नेता अडचणीत? अजितदादांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, नेमकं कारण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com