Indapur Politics: इंदापूरवरुन महायुतीत महाभारत! हर्षवर्धन पाटील आक्रमक, अजित पवारांसह प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनाही इशारा
Indapur Assembly Election Seat Controversy: Saamtv

Indapur Politics: 'इंदापूर'वरुन महायुतीत महाभारत! हर्षवर्धन पाटील आक्रमक, अजित पवारांसह प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनाही इशारा

Indapur Assembly Election Seat Controversy: अजित पवार इंदापूरची जागा आमच्याकडेच असल्याचा दावा करत आहेत, त्यांना हा अधिकार कोणी दिला? असा सवाल उपस्थित करत हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
Published on

मंगेश कचरे| इंदापूर, ता. ३० ऑगस्ट २०२४

इंदापूर विधानसभेच्या जागेवरुन महायुतीमध्ये महाभारत होण्याची शक्यता आहे. इंदापूर विधानसभेची जागा सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे (अजित पवार गट) असून दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. दुसरीकडे इंदापूरच्या जागेबाबत देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असा शब्द अजित पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीवेळी दिला आहे, असे म्हणत भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. याचसंदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही थेट इशारा दिला आहे.

Indapur Politics: इंदापूरवरुन महायुतीत महाभारत! हर्षवर्धन पाटील आक्रमक, अजित पवारांसह प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनाही इशारा
Pune Crime News : पुण्यात घडतायेत अजब गजब चोऱ्या; आता मोबाईल टॉवरवरील या महागड्या वस्तू लुटल्या

इंदापूरवरुन महायुतीत ठिणगी!

लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी इंदापूर विधानसभेबाबत देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य असेल असा शब्द दिला आहे. मात्र आता ते इंदापूरची जागा आमच्याकडेच असल्याचा दावा करत आहेत, त्यांना हा अधिकार कोणी दिला? असा सवाल उपस्थित करत हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

हर्षवर्धन पाटील यांचा अजित दादांना सवाल!

"भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांचे माझे व्यक्तिगत, वैचारिक चांगले संबंध आहेत. मी त्यांना याबाबत भेटणार आहे. जी चर्चा लोकसभेला झाली. तुम्ही इंदापूरबाबत काय बोलला? तुम्ही इंदापूरमध्ये येऊन बोलून गेल्यानंतर मागच्या आठ दिवसांपूर्वी राष्ट्रवादीची यात्रा आली, त्यामध्ये ते काय बोलले? हा महायुतीचा धर्म आहे का? जागा वाटप अद्याप होणार आहे, त्याआधी महायुतीला हा अधिकार कोणी दिला?" असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Indapur Politics: इंदापूरवरुन महायुतीत महाभारत! हर्षवर्धन पाटील आक्रमक, अजित पवारांसह प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनाही इशारा
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी शरद पवारांची ताकद वाढली, भाजपला मोठा धक्का; बडा नेता लवकरच तुतारी फुंकणार

उमेदवारी जाहीर कशी केली?

"मी अजितदादांनाही याबाबत विचारतो. तुम्ही इंदापूरमध्ये येऊन काय सांगितले. इंदापूरचा राजकीय निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील तो मान्य करणार हा माझा जाहीर शब्द आहे. मगं आता तुम्ही इंदापूरला येऊन उमेदवारी जाहीर कशी केली," असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले. तसेच यावेळी बोलताना त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनाही थेट इशारा!

"मी कोणत्याही प्रकारची भूमिका घेतलेली नसताना या पद्धतीच्या भूमिका जर मांडायला लागला तर इंदापूर तालुक्यातील सामान्य माणसांना दुखवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? या गोष्टी चांगल्या नाहीत, हर्षवर्धन पाटील आयुष्यात सर्व काही सहन करेल पण अपमान सहन करणार नाही," असे म्हणत त्यांनी थेट चंद्रशेखर बावनकुळे यांनाही इशारा दिला आहे. त्यामुळेच आता इंदापूरच्या जागेवरुन महायुतीमध्येच महाभारत होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Indapur Politics: इंदापूरवरुन महायुतीत महाभारत! हर्षवर्धन पाटील आक्रमक, अजित पवारांसह प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनाही इशारा
Mumbai News: PM मोदींच्या दौऱ्याआधी मोठ्या घडामोडी! काँग्रेसचं आंदोलन, खासदार वर्षा गायकवाड स्थानबद्ध; मुंबईत वातावरण तापलं!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com