पुणे शहर शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं... मात्र हल्ली या शहरात चोऱ्या, दरोडे आणि कोयता गँगची दहशत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये हौसेपोटी सायकल चोरून त्या निर्जनस्थळी फेकून दिल्या जात होत्या. आता चक्क पुण्यात पुण्यात मोबाईल टॉवरवर ४ जी नेटवर्कसाठी बसविलेले महागडे रिमोट रेडीओ युनीट चोरी केली जात आहे. त्यामुळे चोरांची मजल कठुपर्यंत जात आहे यावरून अंदाज येतो. पोलिसांसमोरही पुण्यातील या चोरांना पकडणं आव्हान बनलं आहे.
आज मोबाईल टॉवरवर ४ जी नेटवर्कसाठी बसविलेले महागडे रिमोट रेडीओ युनीट चोरी करणाऱ्या एकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून ५ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिलशाद मोहमद रफिक (वय ३२, रा. खडी मशिन चौक, कोंढवा, मुळ. रा, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या गुह्यात यापूर्वी अक्षय शांताराम बोडके (वय २६), अशिष अशोक शिंदे (वय ३९, दोघे, रा. बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आलेली होती. तर रफिक हा फरार होता.
फिर्यादी मोरे काम करत असलेल्या कंपनीने धनकवडी व साई कृपा सोसायटी,सहकारनगर येथे टॉवर बसवले होते.या टॉवरवर एका मोबाईल कंपनीने ४ जी नेटवर्कसाठी रिमोट रेडीओ युनीट बसविले. एकूण ९ मशिन्स होत्या, मात्र, मार्च महिन्यात चोरट्यांनी टॉवरवर बसवलेले युनिट चोरून नेले. दरम्यान दहिहंडी सणानिमीत्त सहकारनगर पोलीस पेट्रोलींग करीत असताना आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून ५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.