Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी शरद पवारांची ताकद वाढली, भाजपला मोठा धक्का; बडा नेता लवकरच तुतारी फुंकणार

Maharashtra Vidhan Sabha Election : एकीकडे इंदापूरचे भाजपचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली असतानाच दुसरीकडे पंढरपुरात भाजपला मोठा धक्का बसलाय.
विधानसभेपूर्वी शरद पवारांची ताकद वाढली, भाजपला मोठा धक्का; बडा नेता लवकरच तुतारी फुंकणार
Maharashtra Vidhan Sabha ElectionSaam TV
Published On

विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलाय. महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातच निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे अनेक माजी आमदार विरोधकांच्या संपर्कात आहेत. एकीकडे इंदापूरचे भाजपचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली असतानाच दुसरीकडे पंढरपुरात भाजपला मोठा धक्का बसलाय.

विधानसभेपूर्वी शरद पवारांची ताकद वाढली, भाजपला मोठा धक्का; बडा नेता लवकरच तुतारी फुंकणार
Vidhan Sabha Election : विधानसभेपूर्वी भाजपची ताकद वाढली; माजी मुख्यमंत्री कमळ हाती घेणार

पंढरपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. वसंतराव देशमुख हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी अचानक पक्ष सोडल्याने भाजपसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला वसंतराव देशमुख यांची देखील उपस्थिती होती. कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी भाजपचे कमळ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतलाय.

कोण आहेत वसंतराव देशमुख?

वसंतराव देशमुख हे पंढरपूरच्या (Pandharpur) पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. याशिवाय ते सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देखील राहीले आहेत. मागील 40 वर्षांपासून देशमुख भारतीय जनता पार्टीत सक्रिय आहेत. माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.

तसेच विजयसिंह मोहिते पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. पंढरपुरातील तळगाळातल्या कार्यकर्त्यांसोबत त्यांचा तगडा जनसंपर्क आहे. आगामी विधानसभेची निवडणूक लढवावी अशी देशमुख यांची इच्छा होती. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडे कानाडोळा केला.

त्यामुळेच देशमुख यांनी भाजपचे कमळ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला. आता शरदचंद्र पवार गटात प्रवेश करून देशमुख हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. बैठकीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील तुतारी कडून निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली होती.

विधानसभेपूर्वी शरद पवारांची ताकद वाढली, भाजपला मोठा धक्का; बडा नेता लवकरच तुतारी फुंकणार
Maratha Reservation : देवेंद्र फडणवीसांना उगाच टार्गेट करू नका; अपक्ष आमदाराची मनोज जरांगेंना विनंती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com