Vidhan Sabha Election : विधानसभेपूर्वी भाजपची ताकद वाढली; माजी मुख्यमंत्री कमळ हाती घेणार

Champai Soren Latest News : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने विरोधी पक्षांचे नेते गळाला लावण्यास सुरुवात केली आहे.
मोठी बातमी! विधानसभेपूर्वी भाजपची ताकद वाढली; माजी मुख्यमंत्री कमळ हाती घेणार
Pm Modi and Amit ShahSaam tv
Published On

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर भारतीय जनता पक्ष सतर्क झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भाजप नेते कामाला लागले आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांनी विरोधी पक्षांचे नेते गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि जेएमएम पक्षाचे नेते चंपाई सोरेन हे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या.

मोठी बातमी! विधानसभेपूर्वी भाजपची ताकद वाढली; माजी मुख्यमंत्री कमळ हाती घेणार
Maharashtra Politics: सोलापूरात महायुतीला खिंडार पडणार? अनेक बडे नेते शरद पवार गटात करणार प्रवेश?

याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. चंपाई सोरेन यांचा भाजप (BJP) प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. येत्या 30 ऑगस्ट रोजी राची येथे सोरेन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. सोमवारी (ता २६) रात्री चंपई सोरेन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

या भेटीत त्यांनी भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं आहे. आसामचे विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्वीट करून यासंदर्भातील माहिती दिली. हिमंता बिस्वा सरमा यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत चंपाई सोरेन यांच्या भेटीचा फोटो देखील पोस्ट केला आहे.

विशेष बाब म्हणजे अगदी काहीच दिवसांपूर्वीच चंपई सोरेन यांनी नवा पक्ष स्थापन करणार अशी घोषणा केली होती. मात्र, आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. चंपई सोरेन यांची मोठी ताकद आहे. मुख्यमंत्रीपदी काम करताना त्यांनी अनेकांची मने जिंकली आहेत. येत्या 3 महिन्यात झारखंड विधानसभेची निवडणूक आहे.

त्यापूर्वी सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला मोठा झटका बसलाय. माजी मुख्यमंत्री आणि पक्षातील अनुभवी नेते चंपई सोरेन भाजपमध्ये प्रवेश करून पुढची निवडणुक लढवणार आहेत. दरम्यान, चंपई सोरेन यांच्यासोबतचा फोटो ट्विट करत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटलंय की, चंपाई सोरेन 30 ऑगस्ट रोजी रांचीमध्ये अधिकृतपणे भाजपमध्ये सामील होतील.

मोठी बातमी! विधानसभेपूर्वी भाजपची ताकद वाढली; माजी मुख्यमंत्री कमळ हाती घेणार
Raj Thackeray : ...तरच आपण शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो; मालवणच्या घटनेने राज ठाकरेंचा संताप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com