Maratha Reservation : देवेंद्र फडणवीसांना उगाच टार्गेट करू नका; अपक्ष आमदाराची मनोज जरांगेंना विनंती

Rajendra Raut on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांनी उगाच देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करू नये, असं आमदार राजेंद्र राऊत यांनी म्हटलं आहे.
Manoj Jarange Patil: मराठ्यांनो, तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत भाजपची एकही जागा निवडून येऊ देऊ नका; मनोज जरांगेंचं आवाहन
Manoj Jarange On Devendra Fadnavis Saam TV
Published On

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षभरापासून आंदोलन करीत आहेत. सरकारने सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, अशी जरांगे यांची मागणी आहे. त्यांची ही मागणी राज्य सरकारने अद्याप मान्य केलेली नाही. त्यामुळे मनोज जरांगे आणखीच आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांवर टीकेचा भडिमार करीत आहेत.

Manoj Jarange Patil: मराठ्यांनो, तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत भाजपची एकही जागा निवडून येऊ देऊ नका; मनोज जरांगेंचं आवाहन
Maharashtra News : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 4 व्यक्तींमुळे कोसळला; संजय राऊतांनी थेट नावंच सांगितली

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या टार्गेटवर विशेषता: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी फडणवीस राजकीय खेळी करीत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. अशातच बार्शी विधानसभेचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगेंना एक विनंती केली आहे.

मनोज जरांगे यांनी उगाच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टार्गेट करू नये, असं आमदार राजेंद्र राऊत यांनी म्हटलं आहे. राज्यात 6 प्रमुख पक्ष असून त्यापैकी 3 पक्ष सध्या सत्तेत आहेत. तर 3 विरोधी बाकावर बसले असून तुम्ही त्यांनाही आरक्षणावर भूमिका मांडायला सांगावी, असंही राऊत यांनी म्हटलंय.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी त्यांचा जर होकार असेल, तर आमची काही हरकत नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात किंवा नाना पटोले यांनी लिहून तसं लिहून द्यावं. हा कागद घेऊन मी ताबडतोब देवेंद्र फडणीस यांच्याकडे जातो आणि त्यांची सही देखील आणतो, असं देखील आमदार राजेंद्र राऊत म्हणाले.

त्यामुळे त्यांच्या या विनंतीला मनोज जरांगे कशा पद्धतीने उत्तर देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. आमदार राजेंद्र राऊत हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी समजले जातात. काही दिवसांपूर्वी त्यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली होती.

सरकार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात कटिबद्ध असून तुम्ही उपोषणाला बसू नका, अशी विनंती देखील आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांना केली होती. त्याचबरोबर जुलै महिन्यात मराठा आरक्षण आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

Edited by - Satish Daud

Manoj Jarange Patil: मराठ्यांनो, तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत भाजपची एकही जागा निवडून येऊ देऊ नका; मनोज जरांगेंचं आवाहन
Vidhan Sabha Election : विधानसभेपूर्वी भाजपची ताकद वाढली; माजी मुख्यमंत्री कमळ हाती घेणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com